लोकसंख्या गणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जनगणना चार्ज अधिकारी, लिपिक आणि तांत्रिक सहाय्यकांना प्रशिक्षण; जनगणना प्रक्रिया नियोजनबद्ध राबविण्यावर भर
marathinews24.com
पुणे – आगामी जनगणना २०२७ च्या अनुषंगाने लोकसंख्या गणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभ – सविस्तर बातमी
Census 2027 Training Pune जनगणना कार्य संचालनालय, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणासाठी रमेश भोसले (JDCO) आणि शशांक रुखाने (SI Gr-II) तसेच निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणनेच्या पुढील टप्प्यातील कामकाजाबाबत जनगणना चार्ज अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहाय्यक यांना संबंधित प्रशिक्षण देण्यात आले.
जनगणना २०२७ च्या अनुषंगाने लोकसंख्या गणनेचे कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी जनगणना प्रक्रिया सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.






















