Breking News
‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खूनलाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकदारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार

कुख्यात गुंड गजा मारणेच्या साथीदारांच्या ४ मोटारी जप्त

मटण बिर्याणी पार्टी प्रकरण

marathinews24.com

पुणे – येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात गुंड गजामारणेला नेले जात असताना पोलीस व्हॅनचा मागावर असलेल्या मारणेच्या साथीदारांच्या ४ महागड्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या. गजा मारणेची सातारा परिसरातील ढाब्यावर झालेल्या मटण पार्टी प्रकरणात मारणेच्या सांगलीतील साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली, तसेच याप्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

धनकवडीत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी 

कोथरुड भागात संगणक अभियंत्याला भर रस्त्यात बेदम मारहाणप्रकरणी मारणेसह ६ जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. याप्रकरणात यापूर्वी मारणेच्या दोन महागड्या मोटारीसह ४ मोटारी जप्त केल्या होत्या. येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मारणेला सांगली कारागृहात हलविण्यात येत असताना व्हॅन सातारा परिसरातील ढाब्यावर थांबविण्यात आली. पोलीस व्हॅनबरोबर मारणेचे साथीदार मोटारीत होते.

ढाब्यावर थांबलेल्या व्हॅनजवळ मोटारी आल्या. मारणेला साथीदारांनी व्हॅनमध्ये नेऊन बिर्याणी खाण्यास दिली. मारणेबरोबर बंदोबस्तास असलेल्या सहायक निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांनी ढाब्यावर जेवण केले. प्रकाराची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाल्यानंतर त्यांनी चार पोलिसांना निलंबित केले. मारणेला बिर्याणी देणारे, तसेच त्याला भेटायला आलेले साथीदार पांडुरंग उर्फ पांड्या मोहितेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गुन्हे शाखेने मोहितेला सांगलीतून नुकतीच अटक केली. पोलीस व्हॅनचा मारणेच्या साथीदारांनी मोटारीतून पाठलाग केला. सीसीटीव्ही चित्रीकरणात सहा ते सात मोटारी आढळून आल्या आहेत. याप्रकरणात चार मोटारी जप्त केल्या आहेत. उर्वरित मोटारचालकांचा शोध घेण्यात येत आहे. कोथरूड मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी मारणेसह साथीदारांच्या ८ मोटारी जप्त केल्या आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×