Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचे प्रकाशन

चाकणमध्ये चार दिवसीय संत साहित्याचा कार्यक्रम; शंकर महाराज शेवाळे यांचे ज्ञानेश्वरी कथाकथन

marathinews24.com

पुणे – चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा (चाकण) आणि जय भोले अमरनाथ सेवा संघ वाघजाईमाता देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने संत ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र कथा यज्ञाचे आयोजन चाकणमधील वाघजाई नगरात केले होते. चार दिवसीय सोहळ्यात कथाकार सद्‌गुरु ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांचा ज्ञानेश्वर भक्ती कथनाचा कार्यक्रम पार पडला.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन – सविस्तर बातमी 

सोहळ्यात कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांच्या ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते झाले. यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे, विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट श्री क्षेत्र भंडारा डोंगरचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, शिवसेना उबाठा गटाचे उप-तालुकाप्रमुख रामदास धनवटे, प्राध्यापिका-कवियत्री शालिनी सहारे, तात्याकाहेब कड, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर उपस्थित होते.

कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांनी सर्वसामान्य लोकांना ज्ञानेश्वरी समजावी यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथातील ९०३४ ओव्यांचा अर्थ काव्यरूपात गुंफून १२८४ कविता ग्रंथ स्वरूपात आणला आहे. तब्बल ९ वर्षे माऊलींवरची निस्सीम भक्ती, ज्ञानेश्वरीचा दांडगा अभ्यास आणि साधना या मुळेच हे शक्य झाल्याची भावना यावेळी शिळवणे यांनी व्यक्त केली. यावेळी संगीतकार निहार शेंबेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि स्वतः गायलेल्या कवी शिळवणे लिखित पसायदानाच्या अर्थावरील सुरेल गीताचे अनावरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश टोपे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×