Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

पुण्यात २४ तासात ५४ झाडे कोसळली

पुण्यात २४ तासात ५४ झाडे कोसळली

धनकवडी, हिंगणे खुर्द परिसरात सीमाभिंत कोसळल्या

marathinews24.com

पुणे – मुसळधार झालेल्या पावसामुळे पुण्यातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मागील २४ तासात तब्बल ५४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून, दोन ठिकाणी सीमाभिंत कोसळल्या आहेत. सुदैवाने कोठही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. घटनास्थळी जवानांनी तातडीने मदतकार्य करुन रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या, झाडे हटवून रस्ते वाहतुकीस खुले केले. त्यामुळे वाहतूक सुरळित राहण्यास मदत झाली होती. बुधवारी सकाळपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात ५४ ठिकाणी झाडे कोसळल्याची नोंद अग्निशमक दलाकडे झाली आहे.

अपघाताचा रचला बनाव, खोट्या माहितीच्या आधारे लाटला विमा –  सविस्तर बातमी 

शहरात मंगळवारी (दि. २०) दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर चाकरमान्यासह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली होती. रात्री आठनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे आणि सोसाट्याच्या वार्‍याने वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. झाडपडीच्या घटनांची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. रस्त्यात पडलेल्या फांद्या, झाडे हटवून जवानांनी रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले. घोरपडी, धानोरी, कोरेगाव पार्क, येरवडा, एरंडवणे, हडपसर, बावधन, मुकुंदनगर, एरंडवणे, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, वारजे माळवाडी, शंकरशेठ रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता), कोथरूड, शिवाजीनगर, घोरपडी, विश्रांतवाडी भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

पुण्यात बुधवारी (दि. २१ ) सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात ५४ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. मंगळवारी झालेल्या पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलजवळ असलेल्या एसटी कॉलनीत पाण शिरले, तसेच वारजे परिसरातील चर्च, कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या अर्चना ग्रीन सोसायटीचे आवार, सहकारनगर भाग एक परिसरातील पॅसफिक हाईट्स सोसायटीच्या आवारात पाणी शिरले. मोटार पंपाचा वापर करुन पाण्याचा उपसा करण्यात आला.

धनकवडी, हिंगणे खुर्दमध्ये सीमाभिंत कोसळल्या

सीमाभिंत कोसळण्याची घटना धनकवडीतील तीन हत्ती चौकात घडली. तसेच सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरातील अक्षय कॉम्प्लेक्स इमारतीतील सीमाभिंत कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×