डॉ. नीलम गोऱ्हे यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा; विभागीय बैठका घेऊन महिलांच्या सूचनांचा समावेश करणार
marathinews24.com
पुणे – पीसीपीएनडीटी (PCPNDT MTP Task Force) आणि एमटीपी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्कफोर्सच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने शिवसेना नेत्या व विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत टास्कफोर्सच्या आगामी कामकाजाची दिशा, बैठकींचे नियोजन आणि आतापर्यंत समोर आलेल्या प्राथमिक निष्कर्षांबाबत सविस्तर चर्चा झाली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीर – सविस्तर बातमी
PCPNDT MTP Task Force पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांच्या अनुषंगाने ८ सप्टेंबर रोजी टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह सहा महिला आमदारांचा या टास्कफोर्समध्ये समावेश आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी टास्कफोर्सच्या कामाची पद्धत, आवश्यक प्रशासकीय व्यवस्था तसेच पुढील कार्यवाहीबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली.
टास्कफोर्सच्या कामासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय व इतर व्यवस्थांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेण्याची भूमिका व्यक्त केली. ऑक्टोबर महिन्यात टास्कफोर्सची बैठक घेऊन प्रत्यक्ष कामकाजाची आखणी करण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
दुष्काळ, पाणीटंचाई आणि आरोग्याचा संबंधही अभ्यासणार
दुष्काळी परिस्थिती आणि आरोग्याचा जवळचा संबंध लक्षात घेता, पाणीटंचाई, दूषित पाणी तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबतही टास्कफोर्सच्या कामातून समोर येणाऱ्या मुद्द्यांचा संबंधित विभागांमार्फत पाठपुरावा करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. आरोग्यमंत्र्यांनी हे मुद्दे संबंधित मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडे पाठवावेत, जेणेकरून त्यावर समन्वयाने कार्यवाही करता येईल, अशी भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी मांडली.
महिलांच्या सहभागातून विभागनिहाय अभ्यास
महाराष्ट्रातील महिला आरोग्य, PCPNDT MTP Task Force कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या, संस्था आणि संबंधित घटकांशी संवाद साधण्यासाठी विभागनिहाय बैठका घेण्याचे नियोजन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे. आवश्यकतेनुसार काही बैठका ऑनलाइनही घेण्यात येणार आहेत. विविध विभागांतून प्राप्त होणाऱ्या सूचना, अनुभव आणि स्थानिक पातळीवरील अडचणींच्या आधारे टास्कफोर्सच्या पुढील कामाला गती देण्यात येणार आहे.
यावेळी टास्कफोर्सच्या माध्यमातून पुढील पाठपुराव्याचे विविध मुद्दे निश्चित करण्यात आले. तसेच या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या सूचनांचाही विचार करणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.























