Breking News
Pune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडले

हवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर

Sinhagad Fort Conservation

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासह पर्यटक सुविधांना मिळणार चालना

marathinews24.com

हवेली – पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक (Sinhagad Fort Conservation) असलेल्या सिंहगड किल्ला स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे किल्ले सिंहगडासह हवेलीच्या तालुक्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे मत, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी व्यक्त केले.

‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पण – सविस्तर बातमी 

सिंहगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ऐतिहासिक किल्ल्याचे वास्तुशिल्प, तटबंदी, ऐतिहासिक वास्तू व स्मारकांचे जतन होणे आवश्यक होते. त्यादृष्टीने शासनाकडून मंजूर झालेला भरीव निधी हा सिंहगडाच्या संवर्धनासाठी (Sinhagad Fort Conservation) महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या निधीतून किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूंची आवश्यक जतन, संवर्धन व दुरुस्तीची कामे, तसेच पर्यटक व शिवप्रेमींच्या दृष्टीने आवश्यक सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून त्याचसोबत येथील तिसरे छत्रपती राजाराम महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृती स्थळाकडेही शिवप्रेमींचा कल वाढणार असल्याचे शिवभक्तांनी सांगितले.

सिंहगड किल्ला महाराष्ट्राच्या शौर्य, पराक्रम आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे ऐतिहासिक स्मारक आहे. त्यामुळे या किल्ल्याचे संवर्धन करून त्याचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जतन करण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची भावना शिवभक्तांनी व्यक्त केली.

Sinhagad Fort Conservation सिंहगड किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीसाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, एकनाथजी शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार, आमदार भीमराव तापकीर, आमदार ज्ञानेश्वर कटके व महायुती सरकारचे हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी, हवेली तालुक्याच्या वतीने आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×