अलका टॉकीज चौकात आंदोलनास पोलिसांचा नकार; पर्यायी ठिकाणांचा प्रस्ताव
marathinews24.com
पुणे – एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार २७ सप्टेंबरपासून अलका टॉकीज (Rohit Pawar MPSC Protest) चौकात उपोषण व आंदोलन करण्यासाठी मागितलेली परवानगी पुणे पोलिसांनी नाकारली आहे. अलका टॉकीज चौक हा शहरातील महत्त्वाचा व संवेदनशील टप्पा असून, गणेश विसर्जन मिरवणुकीनंतरही तेथील कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता महत्त्वाचे असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
अलका टॉकीज चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आणि त्या परिसरातील संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्राप्त अधिकारांनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसह एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या (Rohit Pawar MPSC Protest) मागणीसाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी सुरुवातीला २६ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्या दिवशी विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त असल्याने आंदोलनाची तारीख २७ सप्टेंबर करण्याची मागणी पवार यांनी केली होती.
याबाबत पोलिसांकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला होता. त्यावर पोलिस प्रशासनाने अलका टॉकीज चौकातील आंदोलनाची मागणी अमान्य केली आहे. दरम्यान, आंदोलनासाठी विभागीय आयुक्त कार्यालय किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर यांसारख्या पर्यायी ठिकाणांचा प्रस्ताव प्रशासनाने आंदोलकांना दिला आहे. मात्र, अलका टॉकीज चौकातच आंदोलन करण्याची मागणी मान्य करण्यात आलेली नाही.
२७ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा
Rohit Pawar MPSC Protes रोहित पवार यांनी मंगळवारीच २७ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता अलका टॉकीज परिसरात आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पोलिसांनी परवानगी दिली नाही, तरी आंदोलन करणारच, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. हे ठिय्या आंदोलन असून, ते किती दिवस चालेल हे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. काही विद्यार्थी उपोषण करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता अलका टॉकीज चौकातील आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने रोहित पवार आणि आंदोलक पुढील भूमिका काय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.























