Breking News
“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या

ट्रक चालकाला धमकावून १० हजारांची केली वाटमारी

ट्रक चालकाला धमकावून १० हजारांची केली वाटमारी

सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील अंमलदार निलंबित

marathinews24.com

पुणे – ट्रक चालकाला मोबाईलवर बोलत ट्रक चालवत असल्याचा आरोप करुन १५ हजार रुपयांच्या दंडाची भीती दाखवून १० हजार रुपये घेऊन वाटमारी करणाऱ्या सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदाराला पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबित केले आहे. नील बापूराव पोपट ढोले असे निलंबन केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांनी पाठविलेल्या अहवालावरून पोलिसांनी कारवाई केली आहे.

पुण्यात अवैध धंद्याला पाठबळ देणे भोवले, पोलिस उपनिरीक्षक निलंबित – सविस्तर बातमी 

पोलिस अंमलदार नील ढोले याने १५ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड शिवापूर बोगद्याच्या पुढे साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाला अडवले. ट्रकचालक राहुल कुमार शिवनाथ यादव (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना ‘आप फोन पे बात कर रहे है, उसका चालान १५ हजार रुपये है’ असे म्हणून १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांना स्वत:च्या गाडीत बसवले. माझ्याकडे ऐवढे पैसे नाहीत, बँक खात्यात १० हजार रुपये आहेत, असे सांगितले. तेव्हा ढोलेने ट्रक चालकाला खेड शिवापूर परिसरात पेट्रोल पंपावर गेला. तेथील कर्मचाऱ्याला ऑनलाईन पैसे वर्ग करण्यास सांगितले. परंतु, त्याने रोख पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तो ट्रक चालकाला गॉगल स्टॉलच्या दुकानात घेऊन गेला. तेथील दुकानदाराला ऑनलाईन पैसे देऊन त्याच्याकडून १० हजार रुपये घेतले.

वाटमारीनंतर ट्रक चालक राहुल यादव यांनी तक्रार केली. त्याची चौकशी करण्यासाठी नील ढोले याच्याशी संपर्क साधला गेला. त्यावेळी त्याने ट्रक चालकाची माफी मागून १० हजार रुपये ट्रक चालकाला परत केले. पोलिस दलाच्या कर्तव्याशी प्रतारणा करणारे अत्यंत गलिच्छ व भ्रष्टाचाराला पोषण देणारे कृत्य केल्याने पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी नील ढोले याला निलंबित करण्याचे आदेश दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×