पिस्तुलाचा धाकाने पिता-पुत्राला जिवे मारण्याची धमकी

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

माजी सैनिक अटकेत

marathinews24.com

पुणे – पिस्तुलाचा धाक दाखवून पिता-पुत्राला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी सैनिकाला अटक करण्यात आली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावात घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मनोज लक्ष्मण शेजवळ (वय ४४, रा. वलवा वस्ती) यांना अटक केली आहे. दत्तात्रय जयवंत फडके (वय ५५) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावातील आश्रम शाळेजवळ रविवारी ही घटना घडली. शेजवळ याच्याकडे शस्त्र परवाना असून, पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे.

वाहन वळवण्याच्या वादातून पर्यटकाचा खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजवळ सैन्य दलातून निवृत्त झाले असून, फडके यांच्या घराशेजारी राहायला आहेत. रविवारी (२५ मे) रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते मित्राच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी जेजुरीला गेले होते. त्यावेळी तेथे शेजवळ आला असता मस्करीतून त्यांच्यात वाद झाला. जागरण गोंधळ कार्यक्रम आटोपून ते पु्न्हा वडकी गावात आले. फडके आणि त्यांचा मुलगा प्रणिल हे घरात होते. त्यावेळी शेजवळने फडके यांना शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. फडके यांनी त्याला विचारणा केली. ‘जेजुरीत तू माझ्या सगळ्यांसमोर अपमान केला. तू येथे बाहेरून पोट भरण्यासाठी आला आहे. तू येथे कसा राहतो हेच पाहतो. तुला आणि तुझ्या पोराला जिवे मारुन टाकतो‘, अशी धमकी दिली.

फडके यांनी शेजवळ याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. फडके यांचा मुलगा प्रणिलने माराहाणीच्या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. शेजवळने त्याला शिवीगाळ करीत दुचाकीच्या डिक्कीतून पिस्तूल काढले. फडके यांच्यावर पिस्तूल रोखून ‘दोघांना गोळ्या घालून मारून टाकीन, आजच्या आज तुम्ही गाव सोडून जायचे’, अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या फडके यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. शेजवळ सैन्य दलातून निवृत्त झाला असून, त्याने पिस्तुलाच्या धाकाने दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याला अटक केली असून, त्याच्याकडील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, असे फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×