Breking News
हिंदुस्थानची जीवनशैली पर्यावरण पूरक- माजी केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकरकुख्यात गुंड शाहरुख ऊर्फ हट्टी रहीम शेख याचा एन्काऊंटर; सराईत टिपू पठाण टोळीत होता कार्यरतसंतांच्या पालखी सोहळ्यांना आधुनिकेचा साज…नीट २०२५ निकाल जाहीर; राजस्थानचा महेश देशात प्रथम, महाराष्ट्राचा कृषांग तिसराआषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जारीशालेय साहित्य खरेदी आणि चतुर्थीनिमित्त गर्दीलूटमार करणारा सराइत गजाआड..विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे सर्वतोपरी सहकार्य-दादाजी भुसेशिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हेशिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

वाहन वळवण्याच्या वादातून पर्यटकाचा खून; दोघे जखमी

वाहन वळवण्याच्या वादातून पर्यटकाचा खून; दोघे जखमी

लोणावळ्यात पर्यटकाचा खून; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वाहन वळविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पर्यटकाचा खून करण्यात आल्याची घटना लोणावळ्यात घडली. मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (२५ मे) रात्री लोणावळ्याजवळील कार्ला फाट्याजवळील दहिवली गावातील फार्म हाऊसजवळ घडली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

रूपाली चाकणकर समर्थक तरुणी कडून महिलेला धमकी – सविस्तर बातमी 

कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. आडूर कोंडकरूल, गुहागर, रत्नागिरी) असे खून झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. मनोज मधुकर वरवटकर (वय ४२), प्रज्वल उदय मेहता (वय २६) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. ते पर्यटनासाठी आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी कार्ला फाटा परिसरातील दहिवली गावाजवळ वाहन वळविण्याच्या कारणावरून पर्यटक आणि स्थानिक तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. स्थानिकांनी लोखंडी गज,दांडके, मोटारीच्या वायपरनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात कमलेश धोपावकर यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघे पर्यटक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत मनोज वरवटकर यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निकेश कांबिरे (रा. कर्जत, रायगड), प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (दोघे रा. वेहेरगाव, मावळ), गौरव संजय पट्टाधारी (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांच्यासह अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top