रुपाली चाकणकर समर्थक तरुणीकडून महिलेला धमकी

रुपाली चाकणकर समर्थक तरुणीकडून महिलेला धमकी

राज्य महिला आयाेगासह मुख्यमंत्री कार्यालयाकडे संगीता भालेरावांची तक्रार

marathinews24.com

पुणे – राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या तक्रारीची दखल वेळेत न घेतल्याने तिला टाेकाचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत चाकणकर यांच्या समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती सेल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष साेनाली गाडे यांनी महिलेस फाेन करुन धमकावल्याचा प्रकार समाेर उघडकीस आला आहे. संबंधित महिला संगीता भालेराव यांनी थेट राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय व पुणे पाेलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

आंदेकर टोळीच्या प्रतिस्पर्धी टोळीतील मोरक्या उदात्तीकरण – सविस्तर बातमी

साेनाली गाडे यांनी धमकी दिल्याचा संभाषणाचा ऑडिओ साेशल मिडियायर व्हायरल झाला आहे. भालेराव यांनी फेसबुकवर रुपाली चाकणकर यांच्या अकार्यक्षमतेबाबत पाेस्टद्वारे टीका केली हाेती. त्यामुळे साेनाली गाडे यांनी त्यांना फाेन करुन धमकावले. त्यावर भालेराव यांनी तक्रार करुन सखाेल चाैकशी करुन दाेषींवर कठाेर कारवाई मागणी केली आहे. भालेराव यांनी सांगितले की, मी सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी असून, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण घटना मनाला हेलावून टाकणारी हाेती. त्या संवेदनशीलतेमधून तिला न्याय मिळण्यासाठी मागणी करणे, संबंधितांना जाब विचारणे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

साेनाली गाडे हिने माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली असून संबंधित पाेस्ट डिलीट करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. तसेच अन्य ठिकाणी साेशल मिडियावर मला असभ्य शब्द वापरत धमकी देत शिवीगाळ केली. महिलांसाठी सर्वात वाईट शब्द समजला जाणारा शब्द म्हणजे वाझांटाे सारख्या शब्द व इतर महिलेस लज्ज उत्पन्न करणारे शब्दप्रयाेग त्यांनी वापरल्याने मला मानसिक त्रास झाला. साेशल मिडियात माझी बदनामी देखील केली आहे. सत्ताधाारी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी त्या असून त्या पदाचा त्यांनी गैरवापर करत धमकावले असून, मला १८ वेळा काॅल केला आहे.

साेनाली गाडे हिच्यावर यापूर्वी भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून ती ज्यांच्यासाठी हे करते त्या रुपाली चाकणकर यांच्याकडून माझ्या जिवीतास धाेका आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर, साेनाली गाडे व स्नेहल चव्हाण यांच्या विराेधात माझी तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×