Breking News
गोळीबारात सराइताचा साथीदार जखमी‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसइतिहास, संस्कृती जतन करणे आपले कर्तव्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजनबारामतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबीराचे आयोजनवादातून मित्राचा कालव्यात ढकलून केला खूनजेईई’चे वर्ग बंद करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूकगुंगीचे इंजेक्शन टोचून तरुणीवर बलात्कारपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त; पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजनमाहिती कार्यालयातील वाहनचालक विलास कुंजीर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी तात्पुरता बंद

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी तात्पुरता बंद

दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

marathinews24.com

पुणे – राज्यासह ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासोबत सिंहगड परिसरात दरड कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही अतिवृष्टीचा इशारा दिलेला असून, त्यापार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सिंहगड किल्ला २९ मे पासून तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय सुरक्षिततेच्यादृष्टीने आयोजित व्याख्यानाकरीता नावे कळविण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

सिंहगड किल्ला गुरुवार, दिनांक २९ मे पासुन पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने निर्णय लागू करण्यात आला आहे. ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. कल्याण दरवाजा, आतकरवाडी व इतर सर्व पायी मार्ग बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून संभाव्य आपत्ती टाळता येईल असे आवाहन वन विभागाच्या उपवनसंरक्षकांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top