Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

अफुच्या बोंडाचा चुरा बाळगणारा तस्कर अटकेत

अफुच्या बोंडाचा चुरा बाळगणारा तस्कर अटकेत

५ लाखांचे अमली पदार्थ जप्त

marathinews24.com

पुणे – अफुच्या बोडांचा चुरा बाळगणाऱ्या राजस्थानी तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो अफुच्या बोंडाचा चुरा, अफू असे ५ लाख १३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात ही कारवाई केली आहे. अर्जुन सुखराम काला (वय ३१, रा. शिक्षकनगर, येवलेवाडी, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुणे शहरात घरफोडीचे सत्र कायम; १८ लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक येवलेवाडी भागात गस्त घालत होते. त्यावेळी काला याच्याकडे अफुच्या बाेंडाचा चुरा (पाॅपी स्ट्राॅ), अफू असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून काला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. पिशवीत एक किलो ७२८ ग्रॅम अफुच्या बोंडाचा चुरा, तसेच ५८ मिलिग्रॅम अफू सापडली. कालाने अमली पदार्थ कोठून आणले, तसेच कोणाला विकणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एक) वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, स्वप्नील मिसाळ यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×