Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

जेईई’चे वर्ग बंद करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक

खासगी संस्थेच्या संचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – जेईई’ मार्गदर्शनासाठी खासगी शिकवणीवर्ग अचानक बंद करून ३१ विद्यार्थ्यांकडून ४५ लाख रुपये शुल्क घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका संस्थाचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बरकत कादरी (वय ४८, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुंगीचे इंजेक्शन टोचून तरुणीवर बलात्कार – सविस्तर बातमी

याप्रकरणी ‘फिटजी’ या खासगी मार्गदर्शन संस्थेचे व्यवस्थापक संचालक दिनेशकुमार गोयल, मनीष आनंद, राजीव बब्बर, तसेच राजेशकुमार कर्ण (रा. वाकड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २१ जून २०२४ ते २९ मे २०२५ या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वारगेटमधील वेगा सेंटर इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ‘जेईई’ मार्गदर्शन वर्ग सुरू केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात एक वर्षाचे शुल्क घेतले होते. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाच्या प्रवेशासाठी सुरुवातीला २८ हजार ८०० रुपये दिले. त्यानंतर ७५ हजार ३०० रुपये भरले होते. मार्गदर्शन वर्गात ३० विद्यार्थ्यांनी पैसे भरले होते. मात्र, अचानक राजेशकुमार कर्ण याने पालकांची ‘ऑनलाइन मीटिंग’ घेतली. वर्ग बंद केला असल्याचे सांगितले.

पालकांनी शुल्काबाबत वारंवार मेलद्वारे विचारण केली, तसेच शुल्क परत देण्याची मागणी केली. शुल्क परत न देता एकूण ३१ पालकांची ४५ लाख २३ हजार रुपयांना फसवणूक केली. स्वारगेट पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×