Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पुण्यासह नाशिकमध्ये दागिने हिसकावणारी चोरट्यंची टोळी गजाआड

पुण्यासह नाशिकमध्ये दागिने हिसकावणारी चोरट्यंची टोळी गजाआड

वाघोली पोलिसांनी केली कारवाई 

marathinews24.com

पुणे– पुण्यासह नाशिक शहरात महिलांकडील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात आली. वाघोली पोलिसांनी ही कारवाई केली. चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, दुचाकी आणि मोबाइल संच असा १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राध्यापकच बनला मुन्नाभाई, अभियांत्रिकी परीक्षेमध्ये केला गैरप्रकार – सविस्तर बातमी 

प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. शिवाजीनगर, सातपूर. नाशिक), कुणाल विश्वनाथ साबळे (वय २१, रा. स्वामीनगर, सिडको, नाशिक), ताजीम सल्लाउद्दीन अन्सारी (वय २०, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक), संतोष संजोग भांगरे (वय १८, रा. सातपूर, नाशिक), मनोज उदय पाटील (वय ३१, रा. शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी यादव आणि साबळे यांनी वाघोली भागात एका महिलेचे दागिने हिसकावले होते. या गुन्ह्याचा वाघोली पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.

यादव आणि साबळे यांनी दौंड परिसरातून दुचाकी चोरुन महिलेचे दागिने हिसकावून नेले होते. याबाबतची माहीती तपास पथकातील पोलीस कर्मचारी साईनाथ रोकडे, दीपक कोकरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास करुन दोघांना ताब्यात घेतले. तपासात यादवने साथीदार अन्सारी याच्यासोबत पुणे शहरातील विमाननगर, कोरेगाव पार्क भागात दागिने हिसकाविण्याचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. पोलिसंनी अन्सारीला ताब्यात घेतले.

चौकशीत यादव, साबळे आणि अन्सारी यांनी दागिने नाशिकमधील साथीदार भांगरे, पाटील यांच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याची माहिती मिळाली. पोलिसंनी भांगरे आणि पाटील यांना ताब्यात घेतले. आरोपींनी नाशिक, तसेच पुणे शहरातील वाघोली, विमाननगर, कोरेगाव पार्क, तसेच जिल्ह्यातील दौंड शहरात गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक मनोज बागल, बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, रामचंद्र पवार, समीर भोरडे, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मंगेश जाधव, राजाराम अस्वले यांनी केली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×