Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

प्राध्यापकच बनला मुन्नाभाई, अभियांत्रिकी परीक्षेमध्ये केला गैरप्रकार

प्राध्यापकच बनला मुन्नाभाई, अभियांत्रिकी परीक्षेमध्ये केला गैरप्रकार

विद्यार्थ्यांकडून पैसे घेउन पुन्हा लिहायला दिले पेपर

marathinews24.com

पुणे – प्राध्यापकाने साथीदारांच्या मदतीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारून त्यांना परिक्षेचे पेपर बेकायदेशिर मार्गाने पुन्हा लिहण्याची संधी दिल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या युनीट सहाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मॅथेमॅटीक्स २ या विषयाचे लिहीलेले उत्तरपत्रिकेचे ६ बंडल, २ लाख ६ हजारांची रोकड, उत्तरपत्रिका ठेवलेली कंट्रोल रुमची चावी असे साहित्य जप्त केले आहे.

वाघोलीतील नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पेपर फुटी – सविस्तर बातमी 

प्रा. प्रतिक किसन सातव (वय ३७ रा. केसनंद वाघोली ) आदित्य यशवंत खिलारे (वय २० रा. वाघोली) अमोल आशोक नागरगोजे (वय १९ रा. वाघोली) अनिकेत शिवाजी रोडे (वय २० रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वाघोलीतील पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग कॉलेजचा प्राध्यापक प्रतीक सातव हा विद्यार्थ्यांकडून पैसे घेउन त्यांना मॅथेमॅटीक्स २ चा पेपर रात्री कॉलेजमध्ये लिहण्यासाठी देणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ३ जूनला मध्यरात्रीच्या सुमारास पथकाने कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनियरींग कॅडकॅम विभागात छापा टाकला. त्यावेळी प्राध्यापक प्रतीक सातव हा साथीदारांच्या मदतीने सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या विषयाचे लिहीलेल्या उत्तरपत्रिकेचे ६ बंडल, रोकड, उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रुमची चावीसह मिळून आला.

तसेच कॉलेजमधे शिकणारे प्रथम वर्षाचे ८ विदयार्थी मिळुन आले. प्राध्यापक सातव व त्याचे साथीदारांनी ज्या विद्यार्थ्यांना इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या विषयामध्ये नापास होण्याची भिती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरुन ठेवले होते.

स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता संगनमत करुन प्रत्येक विद्यार्थ्यांकडून त्यांनी १० ते ५० हजार रूपये घेतले. मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, वाघोली कॉलेजमधील परिक्षा कंट्रोल रुमची बनावट चावी तयार करून घेतली. त्या चावीद्वारे कॉलेमधील परिक्षा कंट्रोलरुम उघडून त्यामधील इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या उत्तरपत्रिकेचे ६ सिलबंद बंडल काढून घेतले. विद्यार्थ्यांना त्यांची मुळ उत्तरपत्रिका पुन्हा लिहीण्यासाठी देउन शासनाची फसवणुक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायकपोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, सकटे, तांबेकर, काटे, डोंगरे, व्यवहारे, ताकवणे, धाडगे, मांदळे, पानसरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×