Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

वाघोलीतील नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पेपर फुटी

गुन्हे शाखेच्या पथकाने प्राध्यापकाला केली अटक

marathinews24.com

पुणे – वाघोलीतील एका नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पेपर फुटीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संबंधित कॉलेजमधील एक प्राध्यापक विद्यार्थ्यांकडून १० ते १५ हजार रुपये घेत परीक्षेनंतर रात्री पेपर लिहिण्याची परवानगी देत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री या प्राध्यापकावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून पेपरचे गट्टे देखील जप्त करण्यात आले आहेत.

तोतया वकील स्नेहल कांबळे यांच्याविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना विषयात नापास होण्याची शक्यता वाटत होती, अशा विद्यार्थ्यांकडून संबंधित प्राध्यापक पैसे घेऊन त्यांना संध्याकाळी तोच पेपर पुन्हा लिहिण्याची संधी देत होता. यामध्ये विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिकेत मुद्दाम रिकाम्या जागा ठेवून त्या नंतर भरल्या जात होत्या. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. परीक्षा परिषदेनेही याबाबत चौकशी सुरू केली होती. गुन्हे शाखेने पक्की माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री धाड टाकून संबंधित प्राध्यापकाला अटक केली.

यामुळे वाघोलीतील शैक्षणिक संस्थेची प्रतिमा धोक्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×