Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

ट्रक चालकाने रस्त्यावरच वळण घेतले, मोटार चालकाचा मृत्यू

मद्यधुंद कार चालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले

वाघोलीतील गाडेवस्ती चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत ट्रक चालकाने अचानकपणे उजवीकडे वळण घेतल्यामुळे मोटार चालक तरूण धडकल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात ७ जूनला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील गाडेवस्ती चौकात घडला आहे. याप्रकरणी बेशिस्त ट्रक चालकाविरूद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज चंद्रकांत पाटील (वय ३७ रा. ढुढूळगाव, आळंदी देवाची) असे ठार झालेल्या तरूण मोटार चालकाने नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाउ अनिरूद्ध पाटील (वय २८) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

महापालिकेच्या जागांवर महामेट्रोचा डोळा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज पाटील हे आळंदी देवाची परिसरातील ढुढूळगावात राहायला होते. ते ७ जूनला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोटारीतून वाघोलीतील गाडेवस्ती चौकात ढुढूळगावाकडे जात होते. त्यावेळी गाडेवस्ती चौकात एका ट्रक चालकाने अचानकपणे मुख्य रस्त्यावरच वळण घेतले. त्यामुळे युवराजचे मोटारीवरील नियंत्रण सुटून ट्रकला धडकला. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे युवराजचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून, सीसीटीव्ही फुटेजसह ट्रक क्रमांकाच्या आधारे त्याचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×