Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

स्पोर्टस बाईकवरून सोनसाखळी हिसकावणार्‍या सराईताला बेड्या

८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस, रांजणगावसह एलसीबी पथकाची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसुत्र हिसकावून नेणार्‍या अट्टल चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या रांजणगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून, तब्बल १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८ रा लिंबोडी पोस्ट देवीनिमगाव ता आष्टी जि बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार शरद बापु पवार (रा लोणी सय्यदमीर ता आष्टी) पसार आहे. याप्रकरणी वंदना रोहिदास शेटे (वय ३३ रा. पिंपरी दुमाला ता शिरुर पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पावसामध्ये चमकलेल्या विजेच्या प्रकाशावरुन खुनाची उकल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वंदना शेटे २५ मार्चला रांजणगाव गणपती चौकातील धनगरवाडा स्नॅक्स सेंटरमध्ये होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघाजणांनी पाण्याची बाटली खरेदीच्या बहाण्याने वंदनाला ५० रूपये दिले. त्यानंतर उर्वरित पैसे देत असताना आरोपींनी महिलेच्या गळ्यातील ११ गॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस करीत होते.

घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज तपासुन चोरटयांनी गुन्हा करताना स्पोर्टबाईक वापरली होती. दरम्यानच्या काळात शिरुर, शिक्रापुर, चाकण, आळंदीसह अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच पद्धतीने गुन्हे झाले होते.

परिसरातील मार्गावर १० दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीसांनी संयुक्तरीत्या सापळे रचले. परंतु आरोपी हे वारंवार चकवा देत होते. घटनास्थळापासुन ते बीड जिल्हयापर्यत सुमारे ३०० ते ३५० कॅमेरे तपासले. संबंधित गुन्हा मारुती ऊर्फ गोविंद आंधळे आणि शरद बापु पवार यांनी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आंधळे हा अहिल्यानगर ते शिरूरला स्पोर्टस बाईकवरुन येणार असल्याची माहिती अमंलदार उमेश कुतवळ यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शिरुर हददीत सतरा कमान पुलाच्या अलीकडे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, एपीआय दत्ताजीराव मोहिते, एपीआय कुलदिप संकपाळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, योगेश नागरगोजे, सागर धुमाळ, थोरात, दत्ता शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, संतोष सांळुखे, खरबस, साळवे यांनी केली.

८ गुन्हे उघडकीस, १० तोळे सोने जप्त

स्पोर्टस बाईकवरून प्रवास करीत आरोपींनी शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी देवाची, अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत परिसरात गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली दुचाकी, ८ गुन्हयातील १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×