Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण यांना १४ जून पर्यंत पोलीस कोठडी

शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण

बेकायदेशीर शस्त्र परवाना प्रकरण

marathinews24.com

पुणे – खोट्या माहितीच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्याप्रकरणी दिवंगत वैष्णवी हगवणे हिचा पती शशांक हगवणे आणि त्याचा मित्र निलेश चव्हाण यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल.के.सपकाळ यांनी आरोपींना १४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी त्यांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले होते.

स्पोर्टस बाईकवरून सोनसाखळी हिसकावणार्‍या सराईताला बेड्या – सविस्तर बातमी 

आरोपी निलेश चव्हाण याने दोन दिवस बाळाला घरात कोंडून ठेवून छळ केला आहे. फरार असताना पोलिसांनी त्याच्या घरातून कॉम्प्युटर जप्त केला आहे. त्यात अश्लील व्हिडिओ असून महिला तक्रार देण्यास समोर आली नाही. आरोपी त्याचा पासवर्ड देत नाही त्यामुळे तपास करणे आहे. शस्त्र परवाना बाबत चुकीची माहिती देऊन परवाना मिळवला होता, त्याबाबत चौकशी करणे आहे. आरोपी हा बनावट आधारकार्ड वापरत असल्याचा संशय असून त्याबाबत सखोल चौकशी करणे आहे. बावधन पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल हेच निलेश चव्हाण याचे आहे का याबाबत तपास करणे आहे. आरोपी विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याने त्याची पाच दिवस पोलिस कोठडी मिळावी.

आरोपी अटक झाल्यावर गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे. बाळाचा कोणताही रक्ताचा संबंध नसताना त्याने बेकायदेशीर बाळ सोबत ठेवले. बाळ घेण्यास कस्पटे कुटुंब घरी गेले असता त्यांना नीलेश चव्हाण याने कंबरेचे पिस्तूल काढून धमकावले आहे. तपास मध्ये निष्पन्न झाले की, पिस्तुलाचा गैरवापर करण्यात आला. आरोपी फरार काळात स्वतःचे अस्तित्व लपवून राहिला आहे त्याला कोणी साथीदार यांनी मदत केली याची चौकशी करणे आहे. शस्त्र परवानासाठी जी कागदपत्रे सादर केली ती खोटी, बनावट असल्याचा संशय असून त्याची तपासणी करणे आहे.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे, असे सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी सांगितले. बचाव पक्षाचे वकील स्वानंद गोविंदवार प्रतिवाद करताना ,पोलिसांनी पक्षकारवर लावलेला कलम जामीनपात्र आहे. केवळ पोलिस कोठडी मिळावी यासाठी सेक्शन ७५ लावण्यात आले आहे. बावधन पोलिस ठाण्यात माझ्यावर संबंधित गुन्ह्यात कलम लावले असून त्यात नऊ दिवस पोलिस कोठडी आधीच झालेली आहे. मात्र,त्याच कलमानुसार दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी पुन्हा अटक करणे आणि पोलिस कोठडी मागणे बेकायदेशीर आहे.

बाळ मागण्यासाठी दोन व्यक्ती आले असते पण १०० जणांचा ताफा घेऊन कस्पटे कुटुंब आले होते ही चुकीची पद्धत होती. आरोपीचे लॅपटॉप, पिस्तूल, पासपोर्ट पोलिसांना दिलेला आहे. परवाना पिस्तूल असून दोन वेगळे पिस्तूल नाही. त्यामुळे तपास अधिकारी यांना नेमके काय पुरावे मिळाले त्याबाबत माहिती न देता, पुन्हा पोलिस कोठडी मागणे चुकीचे आहे. कायद्याचा हा गैरवापर असून न्यायालयाने योग्य न्याय द्यावा अशी मागणी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×