Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

अपघातांना जबाबदार असलेली अवजड वाहने जप्त करणार – पोलीस आयुक्तांचा इशारा

परवानेही निलंबत करण्याची प्रक्रिया सुरू- अमितेश कुमार

marathinews24.com

पुणे – शहरात अवजड वाहनांमुळे झालेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात गंभीर स्वरुपाच्या अपघातास असलेल्या अवजड वाहनांची माहिती संकलित करण्यात येत असून, अशी वाहने जप्त करण्यात येणार आहेत. संबंधित वाहन चालकांचा परवानाही रद्द केला जाणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (दि.११) दिला.

शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण यांना १४ जून पर्यंत पोलीस कोठडी – सविस्तर बातमी

मार्केटयार्डातील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी दीपाली सोनी या माहिलेचा मृत्यू झाला. अपघातात दीपालीचे सासरे गंभीर जखमी झाले. शहरात झालेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवजड वाहने, तसेच चालकांवर कडक कारवाईचा इशारा दिला.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असताना अनेक वाहन चालक वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून आले आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, तसेच गंभीर अपघात होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. २०२४ मध्ये शहरात ३३४ प्राणांतिक अपघात (फेटल ॲक्सिडेंट) झाले. या अपघातात ३४५ जणांचा मृत्यू झाला. यंदा २०२५ मध्ये पाच महिन्यात शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात १३३ जणांचा मृत्यू झाले आहेत.

पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन वाहन चालकांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. परवाना रद्द करणे, वाहन जप्त करणे आणि न्यायालयीन कारवाईचा समावेश असणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.
शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभाग आणि महापालिका एकत्रितपणे काम करत असून, नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात विविध ठिकाणी अवजड वाहनांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात वाढले आहेत. त्यामुळे अवजड वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कारवाई केली जाणार आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे

पुण्यात प्राणांतिक अपघात

वर्ष – २०२४, अपघात – ३३४, मृत्यु – ३४५

वर्ष – २०२५, अपघात – १२९, मृत्यू – १३३

(आकडेवारी मे २०२५ अखेरीपर्यंतची)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×