Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

पालखी सोहळ्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार

पालखी सोहळ्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार

पोलिसांकडून दिवे घाटात विशेष खबरदारी

marathinews24.com

पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (१९ जून) श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची तयारी केली असून, सोहळ्यातील वारकरी, तसेच भाविकांची गर्दी विचारात येऊन यंदा एआयचा वापर केला जाणार आहे. विशेषतः गर्दीवर लक्ष ठेवणे आणि नियोजनासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट; मावळ रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस – सविस्तर बातमी 

पुणे शहरात श्री ज्ञानेश्वर महाराज आाणि श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन शुक्रवारी (२० जून) होणार आहे. तर शनिवारी (२१ जून) दोन्ही पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. पालखी सोहळ्यातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भाविकांची सुरक्षा, पालखी सोहळ्यात भाविकांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटना विचारात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. विश्रांतवाडी चौक, संचेती चौक, डेक्कन जिमखाना भागातील नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, गोखले स्मारक चौक (गुडलक चौक), हडपसर गाडीतळ, दिवे घाट येथे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

वाहने आणि वारकरी एकाच वेळी घाटात जाणार नाहीत

दिवे घाटात परिसरात वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, दिंडीतील वाहने आणि वारकरी एकाच वेळी घाटात प्रवेश करणार नाहीत. पहिल्यांदा वारकर्‍यांना मार्गस्थ करण्यात येणार आहे. त्यानंतर दिंडीतील वाहने घाटातून सोडली जाणार आहे. दरम्यान, दिवे घाटातील रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून, रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर फोडला आहे. त्यामुळे डोंगरावरील माती आणि दगड सैल झाले आहेत. दरड कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी घाटात भाविकांना सूचना देणारे फलक लावले आहेत.

गुन्हे शाखेचा राहणार कडक बंदोबस्त

पालखी सोहळा मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी केली आहे. साध्या वेशातील पोलिसांची पथके, गुन्हे शाखेची पथके तैनात ठेवली जाणार आहेत. अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी गणेश इंगळे, एसीपी राजेंद्र मुळिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पाहिले जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×