Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन,पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

संतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीमती सुनेत्राताई पवार, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे,आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली. महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×