Breking News
व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीलाPune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : गांजा विक्री करणार्‍या दोघांना पकडले

४ लाख ३९ हजारांचा गांजा जप्त

marathinews24.com

Pune : गांजा विक्री करणार्‍या दोघांना पकडले – गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तस्करांना अमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रजमधील आंबेगाव परिसरात पकडले. त्यांच्याकडून ४ लाख २९ हजार रुपयांचा २९ किलो गांजा जप्त केला. अक्षय अंकुश माने (वय ३०, रा. घोरपडे पेठ), यश राजेश चिवे (वय १९, रा. दांडेकर पूल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. माने आणि चिवे हे कात्रजमधील आंबेगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आले होते.

पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना – सविस्तर बातमी

अमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते. त्यावेळी दोघे जण दुचाकीवरुन नायलॉनचे पोते घेऊन निघाले होते. रस्त्याच्या कडेला दोघांनी दुचाकी उभी करून ते कोणाची तरी वाट पाहत होते. त्यांच्याकडे असलेल्या पोत्यात गांजा असल्याची मााहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडील असलेल्या पोत्याची तपासणी करण्यात आली. पोत्यात २९ किलो गांजा सापडला. गांजा, मोबाइल संच, दुचाकी असा ४ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला.

आरोपी माने आमि चिवे कोणाला गांजा विक्री करणारा होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. त्यांनी गांजा कोणाकडून खरेदी केला होता. याप्रकरणी अमलीे पदार्थ विरोधी पथकाकडून तपास केला जात आहे. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी बिबवेवाडी, कोंढवा भागात २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले होते.तसेच बुधवार पेठेत फरासखाना पोलिसांनी एकाकडून मेफेड्रोन जप्त केला होते. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, दयानंद तेलंगे, प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, सर्जेराव सागर, सचिन माळवे, संदीप शिर्वेâ, विपुन गायकवाड, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×