Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

Pune : शस्त्राच्या धाकाने मोबाईल चोरणार्‍या टोळक्याला बेड्या

४ गुन्हे उघडकीस, कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

Pune : शस्त्राच्या धाकाने मोबाईल चोरणार्‍या टोळक्याला बेड्या – शस्त्राच्या धाकाने मोबाइल चोरणार्‍या अट्टल चोरट्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल, दुचाकी, धारदार शस्त्र, रोकड असा दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींनी केलेले चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. सिध्दार्थ उमेश मोरे (वय १९ ताडीवाला रोड) कृष्णा उर्फ विकी टिमरेड्डी धनगर (वय २१ रा. १३ ताडीवाला रोड बंडगार्डन) आर्यन संभाजी वाघमारे (वय १९ रा. लोकसेवा वसाहत, ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गांजा विक्री करणार्‍या दोघांना पकडले; ४ लाख ३९ हजारांचा गांजा जप्त – सविस्तर बातमी

कोरेगाव पार्क परिसरात टोळक्याने तरूणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते. याप्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तांत्रिक विश्लेषणासह पोलीस शिपाई वेताळ यांना चोरट्यांनी माहिती मिळाली. तपास पथकाचे उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पडवळ, जढर, शिंदे, तोरसकर, जाधव हे खासगी वाहनाने क्वीन्स गार्डन रेल्वे पटरीच्या बाजुला पोहचले. त्यावेळी संशयास्पद थांबलेल्यांना विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला.

त्यांचा शताफीने पाठलाग करुन करून चार गुन्ह्यांची उकल केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस निरीक्षक संगीता जाधव, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मयुर शिंदे, प्रविण पडवळ,संदीप जडर, राहुल वेताळ, राहुल मोकाशी, योगेश सोनवणे, अमित जाधव, अंकुश खंडसोळ यांनी केली.

शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणार्‍या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल करीत दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे. – सुनील थोपटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×