Pune : नगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

नगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अपघातानंतर वाहन चालक पसार

marathinews24.com

Pune : नगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू – भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघाेली परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले अटक, ८ वाहने जप्त – सविस्तर बातमी 

विमल विजू आहेर (वय ५४, रा. पाटील वस्ती, केसनंद, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आहेर यांचा मुलगा अक्षय (वय २५) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल आहेर ६ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास केसनंद परिसरातून निघाल्या होत्या. पाटील वस्तीतील समृद्धी डेअरीजवळ भरधाव वाहनाने पादचारी आहेर यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या आहेर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस हवालदार गोडसे तपास करत आहेत.

शहरात गेल्या काही महिन्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात १५० हून जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख ऱस्त्यांवर डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर अशा जड वाहनांना दिवसा बंदी घालण्यात आली आहे. आदेश धुडकाविणाऱ्या जड वाहनचालकांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गंभीर स्वरुपाच्या अपघातास जबाबदार असणारी जड वाहने जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×