Breking News
व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीलाPune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हे

मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना चार तासात बेड्या

मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना चार तासात बेड्या

समर्थ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मौजमजा करण्यासाठी घरफोडी करणार्‍या चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली आहे. ही चोरी ५ जुलैला नाना पेठेतील शार्प कलर दुकानात घडली होती. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटुन १५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सुजल राजन परदेशी (वय २० रा. शिवाजी स्टेडीअम समोर २१७ मंगळवार पेठ ) सुभाष राजेश सरोज (वय २१ रा. शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ ) नितीन दिलीप सरोज (वय २२ ) रोहीत मुन्नालाल सरोज (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

घरासमोर पाणी सांडल्याच्या वाद, तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

घरफोडी गुन्ह्याच्या अनुषंगाने समर्थ पोलीस तपास करीत असताना पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख यांनी घटनास्थळासह आजुबाजुच्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केले. बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने चोरी करणार्‍या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मौजमजेसाठी दि.०५ जुलैला शार्प कलर दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. गुन्हयातील चोरी केलेली रक्कम जप्त केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश, यादव यांनी केली.

मौजमजा करण्यासाठी दुकानाचे शटर उचकटून १५ हजारांची रोकड चोरणार्‍या टोळक्यांना अवघ्या चार तासात अटक केली आहे. त्यांनी आणखी गुन्हे केले आहेत का, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. – उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×