Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेटनसरापुरात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यातसत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने व सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खूनलाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकदारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेख

ससून रुग्णालयात सुरक्षारक्षकाला धक्काबुक्कीचा प्रकार

भांडणात मध्यस्थी करणार्‍या तरूणाला बेदम मारहाण

महिलेसह दोघांवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – ससून रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घालून तोडफोड करणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी प्रवेशद्वाराची काच फोडून ईसीजी यंत्राची तोडफोड केली, तसेच सुरक्षारक्षकाला धमकावून धक्काबुक्की केली.

लोकमान्य टिळकांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांचे निधन – सविस्तर बातमी

शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच तोडफोड केल्याप्रकरणी स्वप्नील बारकू धनगर (वय २५), राणी बाबुराव पाटील (वय २५, दोघे रा. मांजरी, हडपसर) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरक्षारक्षक संदीप ज्ञानोबा जाधव (वय २७, रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ससून रुग्णालयात आरोपी धनगर आणि पाटील यांच्या नात्यातील एक जण उपचार घेत आहे. सोमवारी (१५ जुलै) दुपारी एकच्या सुमारास ससूनमधील वाॅर्ड क्रमांक ४० च्या परिसरात धनगर आणि पाटील आले होते. त्यांनी उपचार घेणाऱ्या नातेवाईकाला भेटायचे आहे, असे सांगितले. नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. वाॅर्डात जाता येणार नाही, असे सुरक्षारक्षक जाधव यांनी दोघांना सांगितले.

या कारणावरुन धनगर आणि पाटील यांनी रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जाधव यांनी त्यांना गोंधळ घालू नका, असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी सुरक्षारक्षक जाधव आणि सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. वाॅर्ड क्रमांक ४० च्या प्रवेशद्वाराची काच फोडली, तसेच ईसीजी यंत्राची तोडफोड केली. आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा अणणे, तसेच तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून, पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×