खूनाचा प्रयत्न करणारे टोळके गजाआड

कोंढवा पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पूर्ववैमनस्यातून तरूणावर धारदार हत्यारांनी वार करून खूनाचा प्रयत्न करणार्‍या टोळक्याला कोंढवा पोलिसांनी १२ तासांत अटक केली आहे. ही घटना ११ जुलैला रात्री दहाच्या सुमारास गोकुळनगरात घडली होती. राजु उर्फ राजा संगप्पा गुळकर (वय १८ कोंढवा) तन्वीर अक्रम शेख (वय १९) सुरेंद्र उर्फ अमर भुवनेश्वर साव (वय १९) कैलास बाबुराव गायकवाड (वय २२) कविराज उर्फ केडी सुदाम देवकाते (वय १९) प्रेम उर्फ पप्या यल्लेश घुंगरगी (वय २२) यश उर्फ मास अंबर सोनटक्के (वय १८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

टिळक रस्त्यावर एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणाची फस‌वणूक – सविस्तर बातमी

तरुणावर धारधार हत्यारांनी मारहाण करुन दहशत निर्माण केल्याची घटना ११ जुलैला गोकुळनगरात घडली होती. आरोपी राजु उर्फ राजा संगप्पा गुळकर याच्या सोबत फिर्यादा तरूणाचे पुर्वीचे वाद होते. त्याच रागातून टोळक्याने प्लॅनिंग प्रमाणे तरूणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयते तलवारीने त्यांच्या डोक्यात, पाठीवर, कमरेच्या खाली, हातावर वार करीत गंभीररित्या जखमी केले. गोकुळनगर भागात नागरिकांमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणुन तलवारी हवेत भिरकावुन सार्वजनिक शांतता भंग केली होती. याप्रकरणी गुन्ह्याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश तपास पथकाला दिले.

सहायक निरीक्षक राकेश जाधव यांनी वेगवेगळी पथके तयार केली. त्यावेळी आरोपी हे साळवे गार्डनच्या मागील जागेत लपल्याची माहिती पोलीस अंमलदार सुरज शुक्ला, अभिजीत जाधव, विजय खेंगरे, राहुल शेलार यांना मिळाली. पोलिसांनी चार पथके तयार करुन आरोपींना घेराव टाकला. त्यांना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, एपीआय राकेश जाधव सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, विजय खेगरे, राहुल थोरात, अनिल बनकर, सुजित मदन, विकास मरगळे, केशव हिरवे, राहुल शेलार, शरद पवार यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×