Breking News
पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलानवले पूल परिसरात आंदोलनाला बंदीकात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्यहडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसलाभिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटकाकोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीलापुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावेभारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शनाचे ७ ते ९ मे कालावधीत पुण्यात आयोजनटेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरीजुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

मोटारीची काच फोडून ५ लाखांचे जमीन मोजणीचे यंत्र चोरीला

मोटारीची काच फोडून ५ लाखांचे जमीन मोजणीचे यंत्र चोरीला

विश्रांतवाडीतील घटना

marathinews24.com

पुणे – मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटाॅप, पाच लाखांचे जमीन मोजणीचे यंत्र, सोन्याची अंगठी असा मुद्देमाल लांबविल्याची घटना आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी चौकात घडली. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरांकडून चौघांची ८२ लाख ३५ हजारांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आळंदी रस्त्यावरील डुडुळगावात राहायला आहेत. ते १४ जुलै रोजी रात्री मोटारीतून घरी निघाले होते. त्यांचा जमीन मोजणीचा व्यवसाय आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी विश्रांतवाडी चौकात मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडून जमीन मोजणीचे यंत्र (रोव्हर मशिन), लॅपटाॅप, सोन्याची अंगठी असा मुद्देमाल लांबविला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

क्रेडीट कार्डवरुन ८ लाखांचे कर्ज

लोहगाव भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी ७ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर चोरट्यांनी एका बँकेतून बोलत असल्याची बतावणी करुन तरुण वापरात असलेल्या क्रेडीट कार्डची माहिती घेतली. तरुणाने बँकेच्या तपशीलासह क्रेडीट कार्डचा सांकेतिक शब्द चोरट्यांना दिला. चोरट्यांनी माहितीचा गैरवापर करुन तरुणाच्या क्रेडीट कार्डवरुन ७ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज काढले. याबाबत तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×