Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

आमदाराच्या भावानेच केला कला केंद्रात गोळीबार

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

दौंड चौफुला न्यू अंबिका कला केंद्रात घडली घटना

marathinews24.com

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) आमदाराच्या भावानेच कला केंद्रात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना २१ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास दौंड तालुक्यातील वाखारी गावातील न्यू अंबिका कला केंद्रात घडली आहे. याप्रकरणी भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह चौघांविरूद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरण दाबण्यासाठी यवत पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी आटोकाट प्रयत्न केल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

बारामतीत अल्पवयीन मुलीची छेड, घरच्यांनाही दिली मारण्याची धमकी – सविस्तर बातमी

बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी अशा चौघांविरूद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाखारी (ता. दौड) परिसरात न्यू अंबिका कला केंद्र असून, त्याठिकाणी २१ जुलैला रात्री साडेसातच्या सुमारास आरोपी मांडेकर, जगताप, मारणे गाण्याची बारी पाहण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी काही कारणांवरून वाद झाला. त्याच रागातून चौघेही आरोपी कला केंद्रातून बाहेर आल्यानंतर एकाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर ते घटनास्थळाहून निघून गेले होते. गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून, याप्रकरणी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात आहे.

घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, स्थानिक अन्वेषण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांग यांनी धाव घेतली.

गोळीबाराची घटना २१ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. त्यानंतर तब्बल ३६ तास हे प्रकरण दाबण्यात आले. त्यासाठी स्थानिक पोलिसांसह एका बड्या अधिकार्‍याने दबाव टाकल्याचीही चर्चा आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात मध्यरात्रीनंतरही लावणी सुरू असते. त्यासाठी संबंधित वरिष्ठांना आर्थिंक हातभार लावला जात आहे. त्यामुळेच घटना घडूनही माहिती असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कला केंद्राकडून नेमकी आर्थिंक रसद कोणाकोणाला पुरविली जाते, त्यांच्याविरूद्ध कारवाईच मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×