Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला होत असलेल्या छळप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

मेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हे

राष्ट्रीय महिला आयोगाला तातडीच्या कारवाईचे निवेदन

marathinews24.com

मुंबई – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री व सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व असलेल्या या अभिनेत्रीला त्यांच्या निवासस्थानी होत असलेल्या सातत्यपूर्ण छळप्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाला तातडीच्या कारवाईसाठी निवेदन सादर केले असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

मोक्का’ कारवाईत एक वर्ष फरार असलेला अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित सुप्रसिद्ध अभिनेत्रीने अलीकडील सोशल मीडियावरील व्हिडीओमधून तिला तिच्या स्वतःच्या घरात छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. २०२० पासून अभिनेत्रीच्या निवासस्थानी दरवाजे आपटणे, मोठ्या आवाजात आरडाओरडा करणे असे त्रासदायक वर्तन होत असल्याचे तिने सांगितले आहे. याशिवाय, चोरीच्या घटना, पिण्याच्या पाण्यात छेडछाड झाल्याचा संशय आणि घरगुती मदतनीसांचा छळासाठी वापर केला जात असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी या तक्रारींची गंभीरता व संबंधित अभिनेत्रीची बिघडती तब्येत लक्षात घेऊन महिला आयोगाने तातडीने चौकशी सुरू करावी आणि संबंधित स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या शारीरिक व मानसिक सुरक्षिततेची हमी देणे, एफ.आय.आर. नोंदविण्यासाठी आवश्यक कायदेशीर व मानसोपचार सहाय्य उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

“सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा सन्मान व सुरक्षितता तातडीने आणि काळजीपूर्वक जपली जाणे आवश्यक आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले असून, महिला आयोगाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×