Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

वाहनचोरी करणारा अल्पवयीन ताब्यात, ४ दुचाकी जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध परिसरातून दुचाकींची चोरी करणार्‍या अल्पवीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी वाहन चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्यासह पथकाला दिले होते.

हडपसर बस स्थानकात सलग तिसर्‍या दिवशीही चोरी – सविस्तर बातमी

वाहन चोरीतील गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तपास पथकातील पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे यांना वाहन चोरीतील अल्पवयीन दुचाकीसह मिळून आला. चौकशीत त्याने भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, नांदेड सिटी परिसरातून मिळून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त मिलींद मोहीते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, दिनेश टपके, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांनी केली

अतिरिक्त कमाईचे आमिष पडले ५ लाख २१ हजारांना

सायबर चोरट्यांनी तरूणाला अतिरिक्त कमाईचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख २१ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना ६ जुलैला विश्रांतवाडीत घडली असून, ऋषीकेश मोरे वय २७ रा. विश्रांतवाडी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोरे हे विश्रांतवाडीत राहायला असून, ७ जुलैला सायबर चोरट्यांनी संपर्क केला. प्रीपेड टास्क देउन वेळोवेळी रक्कम पाठविण्यास भाग पाडले. अतिरिक्त कमाईचे आमिषाला बळी पडून मोरे यांनी ५ लाख २१ हजारांची रक्कम ऑनलाईनरित्या वर्ग केली. मात्र, परतावा न देता मोरे यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव तपास करीत आहेत.

गुंतवणूकीच्या आमिषाने ५ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला ५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १८ ते २७ जून कालावधीत पिसोळीत घडली आहे. याप्रकरणी योगेश देसाई वय ४७, रा. पिसोळी यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×