Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

हडपसर बस स्थानकात सलग तिसर्‍या दिवशीही चोरी

शिवीगाळ केल्याच्या वादातून वार, तिघांविरूद्ध गुन्हा

जेष्ठ महिलेचे ६० हजारांचे मंगळसूत्र चोरीला

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर परिसरात बसस्थानकात चोरट्यांनी धुडगूस घातला असून, जेष्ठ महिलांना लक्ष्य करीत सोनसाखळी, मंगळसूत्र, ऐवज चोरून नेला जात आहे. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग तिसर्‍या दिवशी हडपसरमधील बसस्थानकात चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. यापुर्वी गाडीतळ बसस्थानकातून दोन महिलांचे दागिने चोरून नेले होते. त्यानंतर सासवड पीएमपीएल बसस्थानक गाडीतळ याठिकाणाहून चोरट्याने जेष्ठ महिलेचे ६० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले आहे.

नोकरी महोत्सवात ६५ कंपन्यासह १ हजार ५०० तरुण-तरुणींनी घेतला उत्स्फूर्त सहभाग – सविस्तर बातमी

पीएमपीएल बसमध्ये प्रवेश करताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. ही घटना २२ जुलैला दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय महिलेने हडपसर पोलसी ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा माग काढला जात असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर परिसरात राहायला असून, २२ जुलैला दुपारी एकच्या सुमारास सासवड पीएमपीएल बसस्थानक गाडीतळ याठिकाणाहून प्रवास करण्यासाठी थांबली होती. त्यावेळी बसमध्ये प्रवेश करीत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून पोबरा केला. दागिना चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शिंदे तपास करीत आहेत.

दुचाकीस्वाराला उडविले, लॅपटॉप चोरून नेला

भरधाव मोटार चालकाने दुचाकीस्वाराला धडक देउन त्याला खाली पाडले. जखमी तरूणाला मदत न करता त्याच्या पिशवीतील ५० हजारांचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना १७ जुलैला रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यालगत नोबेल रूग्णालयामागे घडली आहे. याप्रकरणी तरूणाच्या वडिलांना हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोलापूरचे रहिवाशी असून, त्यांचा मुलगा १७ जुलैला रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून घरी चालला होता. त्यावेळी भरधाव मोटार चालकाने त्याला धडक देउन खाली पाडले. त्यानंतर संबंधित चालकाने तरूणाला मदत न करता त्याच्या पिशवीतील ५० हजारांचा लॅपटॉप चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार कारंडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×