Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

मिटिंगमध्ये सोसायटीच्या सेक्रेटरीने रोखले मॅनेजरवर पिस्तुल

हिशोबाच्या वादातून पिस्तूल रोखण्याचा धक्कादायक प्रकार

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या हिशोब व्यवस्थील न ठेवल्याच्या वादातून सोसायटीच्या मॅनजेरवरच सोसायटीचा सेक्रेटरी असलेल्या बांधकाम व्यावसायीकाने पिस्तुल रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायीकावर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल यावेळी जप्त करण्यात आले आहे. साहिल मोहन कामत (रा. गॅलक्सी सोसायटी, डि. पी. रोड, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायीकाचे नाव आहे. याबाबत सोसायटीचे मॅनेजर अभिषेक अशोक शिंदे (३८, रा. वेंकटेश पुरम, जांभुळवाडी) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा जपला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत एरंडवणा परिसरातील डी. पी. रोडला गॅलक्सी सोसायटी आहे. याच इमारातीच्या ए बिल्डींगजवळ १८ जुलै रोजी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास सोसायटीची मॅनिजिंग कमटीची मिटींग आयोजीत करण्यात आली होती. साहिल कामत हा सोसायटीचा सेक्रेटरी असून तो बांधकाम व्यावसायीक आहे.

अभिषेक शिंदे हे सोसायटीचे मॅनेजर आहेत. मिटींग सुरू असताना मॅजेरने सोसायटीचा हिशोब व्यवस्थीत न ठेवल्याच्या रागातून यावेळी बाचाबाच झाली. यावेळी कामत याने शिंदे यांना हाताने मारहाण केली. नंतर घरातून पिस्तुल आणून ती लोड करून शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान कामत याच्याकडून परवाना असलेले पिस्तुल जप्त करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिता रोकडे करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×