Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

कला केंद्रातील गोळीबाराप्रकरणी आमदाराच्या भावासह चौघांना अटक

चौफुल्या (ता दौंड) जवळील वाखारीतील कला केंद्रात झाला होता गोळीबार

marathinews24.com

पुणे – कला केंद्रात गाण्याच्या बारीवरून झालेल्या वादात राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेस भोर-वेल्हा-मुळशी आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी यवत पोलिसांनी आमदाराच्या भावासह चौघांना अटक केली आहे. त्यांच्या ही घटना २१ जुलैला वाखारी (ता. दौंड) परिसरातील न्यू अंबिका कला केंद्रात घडली होती. बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे, रघुनाथ आव्हाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

कोथरूडमध्ये चौघांवर प्राणघातक हल्ला – सविस्तर बातमी

पुणे जिल्ह्यातील वाखारी (ता. दौड) परिसरात न्यू अंबिका कला केंद्र असून, त्याठिकाणी २१ जुलैला रात्री साडेसातच्या सुमारास आरोपी मांडेकर, जगताप, मारणे, आव्हाड हे गाण्याची बारीसाठी गेले होते. त्यावेळी एका पार्टीने अगोदरच बारी बुक केल्यामुळे आरोपी मांडेकरसह साथीदारांची संबंधितांसोबत वाद विवाद झाले. त्याच रागातून चौघेही आरोपी कला केंद्रातून बाहेर आल्यानंतर साडेअकराच्या सुमारास मांडेकरने हवेत गोळीबार केला होता. याप्रकरणी आता चौघांनाही अटक केली आहे. न्यू अंबिका कला केंद्रात २१ तारखेला रात्री अकराच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. सत्ताधारी महायुतीतील आमदाराच्या भावानेच गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले होते.

गोळीबारप्रकरणात तक्रारदार कुणीही पुढे येत नव्हते. कला केंद्राचा मालकानेही गोळीबार झालाच नसल्याचे सांगितले होते. मात्र, मॅनेजरला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार चौघांविरूद्ध यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांना अटक केली आहे. त्यांच्योसाबत असलेले साथीदार गणपत जगताप, चंद्रकांत मारणे रघुनाथ आव्हाड यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गोळीबाराला घाबरून नर्तकी बेशुद्ध होउन पडली

आरोपी बाळासाहेब मांडेकर याने न्यू अंबिका कला केंद्रात बंदूक काढून गोळीबार केला. गोळी भिंतीसह छतावर आदळल्यामुळे समोर नृत्यकाम करणारी नर्तकी प्रचंड घाबरली. त्यामुळे तिचा रक्तराब वाढल्यामुळे चक्कर येउन ती जमीनीवर कोसळली. त्यानंतर तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार केल्यानंतर तिला रूग्णालयातून सोडले.

घटना निंदनीय, कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी- आमदार शंकर मांडेकर

माझ्या भावाकडे बंदुकीचा परवाना नसून, तो शेती करतो. तो वारकरी संप्रदायमधील असून, कोणी कुठे जावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी काय खावं, काय प्यावं? हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ही घटना घडल्यावर तो सकाळी घरी आला होता. पण भावाने मला काही सांगितले नाही. याप्रकरणी पोलिसांनी मला फोन करून गोळीबाराची माहिती दिली. घडलेली घटना निंदनीय असून, चुकीचं प्रायश्चित त्याला शासन देईल, अशी प्रतिक्रिया आमदार शंकर मांडेकर यांनी दिली आहे.

कला केंद्रात गोळीबार करणार्‍यासह चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सुरू आहे. –बापूराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×