Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

बारावे विश्वबंधुता विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलन ८ ऑगस्टला पिंपरीत

डॉ. शमसुद्दीन तांबोळी व डॉ. जयकुमार ताम्हाणे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’

marathinews24.com

पुणे – विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे विश्वबंधुता साहित्य संमेलन आयोजित केले आहे. येत्या शुक्रवारी (ता. ८ ऑगस्ट) सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शमशुद्दीन तांबोळी आणि ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. जयकुमार ताम्हाणे यांना जाहीर झाला आहे.

गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडू – उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

तिरंगा महावस्त्र, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिकृती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे व संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी बंधुता परिषदेचे सचिव प्रा. शंकर आथरे, कवयित्री संगीता झिंजुरके, बंधुता प्रकाशनच्या संचालिका मंदाकिनी रोकडे उपस्थित होते.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते होणार असून, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे, कादंबरीकार प्रा. शंकर आथरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारच्या सत्रात पत्रकार-कवी पितांबर लोहार यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकजागर अभिजात मराठी’चा हे काव्यसंमेलन होणार असून, त्यामध्ये प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, संगीता झिंजुरके, सीमा गांधी, संतोष घुले, डॉ. बंडोपंत कांबळे यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवींचा सहभाग असणार आहे.”

डॉ. पांडुरंग भोसले म्हणाले, “संमेलनाचा समारोप पुरस्कार वितरणाने होईल. यावेळी औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षा प्रा. भारती जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब वाघेरे यांना ‘महात्मा फुले समाजसेवक पुरस्कार’, शिवव्याख्यात्या सुलभा सत्तूरवार यांना ‘विश्वबंधुता लोकशिक्षक पुरस्कार’ प्रदान केला जाईल. संमेलनामध्ये निवडक विद्यार्थ्यांना ‘गुणवंत विद्यार्थी’, तर काही शिक्षकांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार दिले जातील. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. संगीता अहिवळे, डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. मारुती केकाणे, प्रा. प्रशांत रोकडे आणि प्रा. सायली गोसावी यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×