Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

खासगी यु ट्युबच्या माध्यमातून पेपर फोडले

पुण्यातील शनिवारवाडा आवारात नमाज पठण भोवले, गुन्हा दाखल

विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या तिसरी ते नववीच्या परिक्षेचे पेपर व त्यांची उत्तरे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी ने घेता प्रसारीत केली. पेपर फोडल्या प्रकरणात आता खासगी यु ट्युब चॅनेलवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्युशन क्लासेस या तीन खासगी युट्युब चॅनेलची नावे समोर आली आहेत.

दुचाकी वाहनासाठी एमएच ४२बीटी क्रमांकाची नवीन मालिका – सविस्तर बातमी

सहायक संचालक संगिता प्रभाकर शिंदे (५०, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट २०२५ रोजी साडे बारा वाजण्याच्या निदर्शनास आला. त्यानुसार खासगी यु ट्युब चॅनेलवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनर्दिष्ट परिक्षांमध्ये होणार्‍या गैर प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत आधिनियमाच्या विविध कलमान्वये तसेच माहिती तंत्रज्ञान, भारतीय न्यायसंहितेच्या ७२, २२३ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार संगिता शिंदे ह्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राज्य शासनाने २०२१ पासून इयत्ता ३ ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्याची क्षैक्षणिक प्रगती होऊन प्रथम भाषा मराठी, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मुल्यांकन चाचणी सुरू केली आहे. त्यानंतर २०२३ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदच्यावतीने राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय व अनुदानित शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता परिषदेतर्फे पायाभुत चाचणी ६ ते ८ ऑगस्ट कालावधीत आयोजित केली होती. त्यानुसार सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी, सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई या सर्वाची पत्रव्यवहार करण्यात आला होता. दि. १७ ते ३१ जुलैपर्यंत परिषदेच्यावतीने परिक्षेसाठी लागणारे पेपर खाजगी कार्गो कंपनी मार्फत पाठविले होते.

६ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता एका युट्युब चॅनेलवर संबधित जिल्ह्यांना पाठविलेल्या चाचणी पत्रिका त्यापैकी सातवीचे मराठीचे पेपर, ५ ऑगस्टला झालेला व ७ ऑगस्टला होणार्‍या सातवी आठवीचे गणिताचे पेपर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान या यु ट्युबची माहिती घेतलयानंतर चॅनेल हे कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्युशन क्लासेस या तीन यु ट्युब चॅनेलची नावे पुढे आली. या खासगी यु ट्युब चॅनेलने कोणतीही परवागी न घेता अज्ञाताकडून हे पेपर मिळवून चॅनेलवर प्रश्न व त्यांची उत्तरे प्रसारीत करून शासकीय आदेशाचा भंग केला. त्यानुसार चॅनेलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×