चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरीला – महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन चोरट्यांनी तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत महावितरणच्या अभियंत्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
हलगर्जीपणा बाळगणार्या ठेकेदारांविरूद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी-म्हातोबाची आळंदी रस्त्यावर महावितरणचे रोहित्र आहे. चोरट्यांनी रोहित्राची तोडफोड करून ८० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. पोलीस कर्मचारी वणवे तपास करत आहेत. ग्रामीण भागात रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. हवेली तालुक्यातील गावांमध्ये रोहित्रांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकऱ्णी लोणीकंद, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवीगाळ आणि धमकावल्याने एकाची आत्महत्या
कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. तुकाराम ज्ञानेश्वर भाले (वय ३८, रा. गारुडी वस्ती, लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत भाले यांच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भाले यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन आरोपी सुनील विजय कसबे (वय ३२), करण साेमनाथ कसबे (वय २२), अक्षय रामजीत केवट (वय ३०, तिघे रा. लोणी काळभोर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाले हे खासगी ठिकाणी काम करत होते. आरोपी कसबे, केवट हे त्यांच्या ओळखीचे होते. आरोपीं त्यांना सतत शिवीगाळ करायचे, तसेच त्यांना मकावून काढण्याची धमकी द्यायचे. आरोपींच्या त्रासामुळे भाले यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आरोपींच्या त्रासामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यची फिर्याद त्यांच्या पत्नीने नुकतीच दिली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील तपास करत आहेत.





















