हलगर्जीपणा बाळगणार्‍या ठेकेदारांविरूद्ध गुन्हा दाखल

पीएमपीएल प्रवासी महिलांचे दीड लाखांचे दागिने लांबविले

नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हलगर्जीपणा बाळगणार्‍या ठेकेदारांविरूद्ध गुन्हा दाखल – ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना तिघे कर्मचारी खड्डयात पडून एकजण ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. ४) संध्याकाळी सातच्या सुमारास नांदेड सिटी कंपाऊंडबाहेर घडली होती. याप्रकरणी कामगार ठेकेदार, पोकलंड मशीन चालक, मुख्य ठेकेदाराविरूद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ बाबासाहेब शेलार (वय ४४ रा. नांदोशी ) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.

ज्येष्ठाला धक्का देऊन सोनसाखळी हिसकाविली – सविस्तर बातमी 

नांदेड सिटी कंपाऊंड वॉलच्या बाहेरील बाजूस ४ ऑगस्टला महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. त्यावेळी काम सुरू असताना तिघे कामगार ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य राबविले. अवघ्या काही मिनीटांमध्ये दोन कामगारांना बाहेर काढले होते. उर्वरित नवनाथ शेलार यांच्या अंगावर माती पडल्यामुळे आणि गुदमरल्याने त्यांना श्वसनाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कामगार ठेकेदार, पोकलंड मशीन चालक, मुख्य ठेकेदारांनी कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही. त्यांना कोणतीही साधने न पुरवता काम केले. त्यानंतर झालेल्या अपघातात कामगाराचा मातीखाली दबून मृत्यू झाला. हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमृता पाटील तपास करीत आहेत.

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; पती, सासू-सासर्‍यासह नातेवाईकांविरूद्ध गुन्हा

माहेरहून सतत पैसे आणण्याच्या मागणीसह सासरच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना ६ ऑगस्टला फुरसुंगीतील राचंदवाडीत घडली आहे. याप्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा अक्षय राखपसरे (वय २४ रा. राचंदवाडी, फुरसुंगी ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी सीमा आणि अक्षय राखपसरे यांचे जुलै २०२० मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर सीमा नांदत असताना तिच्या पतीसह सासू-सासर्‍याने त्रास देण्यास सुरूवात केली. तिला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावण्यात आला. सतत टोचून बोलून तिचा अपमान करण्यात आला. त्रासाला कंटाळून सीमाने ६ ऑगस्टला गळफास घेउन आत्महत्या केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे तपास करीत आहेत.

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एकजण ठार, नर्‍हेतील घटना

विद्युत पोलवर चढून झाडाची वेल काढणे एकाच्या जीवावर बेतले असून, वीजेच्या धक्क्याने संबंधिताचा मृत्यू झाला आहे. ही घटना ७ ऑगस्टला दुपारी सव्वा दोनच्या सुमारास नर्‍हेतील स्वर-स्वरा रेसीडेन्सीमागे नाल्याजवळ घडली आहे. महेबुब कासीम पठाण (वय ४१ रा. दांगट पाटीलनगर, शिवणे ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेबुब हा ७ ऑगस्टला इलेक्टॉनिक्सच्या मेंटनन्सचे काम करीत होता. विद्युत पोलवर चढून तो झाडाचा वेल काढण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, विद्युत प्रवाह बंद न झाल्यामुळे त्याला धक्का बसून, महेबूब खाली कोसळला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×