Breking News
आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंदएकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा – महापौर मंजुषा नागपुरेनोकरीच्या आमिषापोटी तरुणाने गमावले ४२ लाखपॉलिसीचे पैसे मिळवणे पडले महागात

ज्येष्ठाला धक्का देऊन सोनसाखळी हिसकाविली

ज्येष्ठाला धक्का देऊन सोनसाखळी हिसकाविली

सॅलिसबबरी पार्कमधील घटना

marathinews24.com

पुणे – पादचारी ज्येष्ठ नागरिकाला धक्का देऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना सॅलिसबरी पार्क परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोथरूड भागातील बेकरीत आग – बेकरीत अडकलेल्या कामगारांसह रहिवाशांची सुटका – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक सॅलिसबरी पार्कमधील एका सोसायटीत राहायला आहेत. या भागतील एलआयसी काॅलनी परिसरातून ते बुधवारी रात्री आठच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना धक्का दिला. त्यांच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

वारजे भागात घरफोडी, ४ लाखांचा ऐवज लंपास

वारजे भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे भागातील आदित्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पात राहायला आहेत. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ते सदनिका बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील चार लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×