Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

डॉक्टरांची ९६ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी डॉक्टरांची ९५ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डॉक्टरांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसरमधील घरफोडीचा छडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टर हे शिवाजीनगर भागात राहायला आहेत. तक्रारदार डॉक्टरांनी सोशल मीडियावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत जाहिरात पाहिली. त्यानंतर त्यांनी जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढून शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले.

डॉक्टरांनी चोरट्यांच्या खात्यात १६ जून ते १६ जुलै या कालावधीत वेळोवेळी ९५ लाख ६६ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानतंर चोरट्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर परतावा मिळाल्याचे भासविले. मात्र, प्रत्यक्षात त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×