Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

हर्षदा अभिजीत फरांदे यांची भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड

हर्षदा अभिजीत फरांदे यांची भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड

 “पक्ष संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन – हर्षदा फरांदे

marathinews24.com

पुणे – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी  हर्षदा अभिजीत फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.

‘नारी शक्ती महोत्सव २०२६’मधून महिला सक्षमीकरण, संस्कृती आणि कलेचा त्रिवेणी संगम – सविस्तर बातमी 

हर्षदा फरांदे म्हणाल्या, “पक्ष संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन. संघटनेला अधिक बळकटी देण्याची संधी मी निश्चितच आत्मसात करेन. महिला मोर्चाचे जाळे राज्यभर अधिक सक्षम करण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्नशील राहीन.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर जाबबदारी सोपवून दाखवलेल्या विश्वासास निश्चित पात्र ठरू असा विश्वास हर्षदा फरांदे यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×