Breking News
Pune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडाGanesh Visarjan Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीरCrop Damage Pune : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणेKatkari Welfare Schemes : ‘लोकसंवाद-२०२६’मधून कातकरी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहितीपीएमपीएल बसप्रवासात ज्येष्ठ महिलेची बांगडी चोरीलापुण्यात गर्दीत महिलांचे दागिने लांबविलेPune MLC Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरला

पुण्यात विविध ठिकाणी घडले गंभीर गुन्हे

दरोड्यापुर्वीच पुणे पोलिसांनी तीन टोळ्यांचा डाव उधळला

उधारीचे पैसे परत न केल्याने मोबाईलची जबरी चोरी

marathinews24.com

पुणेशहरातील विविध भागात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. उधार दिलेले सहा हजार रूपये परत न दिल्याच्या काराणावरून हाताने मारहाण करत मोबाईल जबरी चोरी करून नेल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कर्वेनगर येथील रत्ना हॉटेल समोरील पुस्तकस्टॉलच्या बाजुला फुटपाथवर दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी मारहाण व जबरी चोरी करणार्‍या निती मारूती साळुंखे (३२) आणि सचिन मारूती साळुंखे (३५, दोघही रा. काका हलवाई स्वीटच्या मागे, देशमुखवाडी शिवणे) या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश गामा गुप्ता (३२, रा. करपेचाळ, कर्वेनगर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (पुण्यात विविध ठिकाणी घडले गंभीर गुन्हे)

ज्येष्ठ महिलेकडील दागिने हिसकावणारे चोरटे गजाआड – सविस्तर बातमी

कोथरूडमध्ये २२ लाखांची घरफोडी

कोथरूड येथील रामबाग कॉलनी येथील केसरी अपार्टमेंटमधील दोन सदनिका फोडून चोरट्यांनी तब्बल २२ लाख १७ हजारांचा ऐवज चोरी करून नेला. ८ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या चोरीच्या प्रकारानंतर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शान चिटणीस (५१, रा. केसरी अपार्टमेंट, पहिला मजला, रामबाग कॉलनी, पौडरोड, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची केसरी अपार्टमेेंट येथे पहिल्या मजल्यावर दोन नंबरची सदनिका आहे. तर पाहिल्या नंबरचीही सदनिका येथेच आहे. दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी चार नंतर चिटणीस याच्या धरात कोणी नव्हते. दरवाजाला कुलुप लावून बाहेर गेले असताना चोरट्यांनी सदनिकेच्या दरवाजाचे कुलुप व लॅच तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी लाकडी कपाटाचे ड्राव्हर उचकटुन त्यामधील हिर्‍यांचे दागिने, सोन्याचे दागिने, चांदीची नाणी व रोख रक्कम असा २२ लाख १७ हजारांचा ऐवज चोरी करून नेला. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांत सदनिका एक आणि दोन मध्ये चोरी झाल्याचा प्रकार नोंद करण्यात आला आहे.

जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण

जुन्या भांडणाचा कारणावरून शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या दोघांना मारहाण करून हत्याराने हल्ला करताना वार अडवले असता एकाच्या अंगठ्याला जखम झाली. हा प्रकार लोहगाव येथील फाळके चौकात घडला. याप्रकरणी माजिद शेख (रा. बिलाल मस्जिद जवळ, कलवड वस्ती) व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आसीफ लालसाहब इंडीकर (२४, रा. फाळके चौक, कलवडवस्ती, लोहगाव) याने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार ८ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेचया दिवशी आसीफचा व त्याचा मित्र सोहेल हे शतपावली करण्यासाठी फाळके चौकात आले असता आसीफचा दुसरा मित्र याने घराच्या टेरेसवयन आवाज देवुन टेरेसवर मोकळ्या हवेमध्ये बसण्यासाठी बोलवले. याचवेळी आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून आसीफला आणि त्याच्या मित्राला जुन्या भांडणाच्या कारणावरून मारत असताना आसीफने यावेळी आडविण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताच्या अंगठ्याला यामुळे दुखापत झाली.

जुन्या वादातुन हत्याराने वार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जुन्या वादातून एकावर धारदार हत्यारांनी वार केल्याचा प्रकार गोंधळेनगर येथील सिध्दीविनायक कॉलनी येथे घडला. यावेळी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा जखमी झाला. याप्रकरणी प्रेमसिंग कल्याणी व त्याचया तीन अनोळखी मित्रांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ७ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता घडला.

बालविवाह लावुन देणे भोवले 

अल्पवयीन असल्याचे माहिती असताना मुलीचा विवाह लावुन तिच्यावर झालेल्या लैगिक अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली. तिच्यावर अत्याचाराला कारणीभुत असलेल्या व बालविवाह लावुन देणार्‍या तिच्या आई-वडील तसेच सासु-सासर्‍यांसह एकूण नातेवाईकांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ मार्च २०२४ ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला. याबाबत एका १८ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे.

येरवड्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत – आठ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

तरूणीचा पाठलाग करून विनयभंग

तरूणीला शेरोशायरी मॅसेज करून तु आज कोणत्या रंगाची साडी ड्रेस नेसला होता, त्यामध्ये तु खुप सुंदर दिसत होती, मी त्याच रंगाचा शर्ट मागवला आहे अशा प्रकारचे व तरूणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असेही मॅसेज पाठवले. तसेच तिचा छुपा पाठलाग करून तिचा विनयभंग करणार्‍या एकावर आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ जुलै रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला.

पहिली मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

पहिली मुलगी झाल्याच्या कारणावरून त्रास देणार्‍या व आईकडून घरखर्चाला पैसे आण म्हणणार्‍या सासरच्यांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती सचिन चव्हाण याच्यासह त्याच्या आई वडीलांवर कौटुंबिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २९ वर्षीय विवाहित महिलेनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१३ पासून ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान कोंढव्यातील सिध्दार्थनगर येथे घडला.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरूणीचा विनयभंग

नोकरीचे दैनदिन काम संपवून थेऊर फाटा येथून खासगी पिकअप चालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधाराचा फायदा घेऊन तरूणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिकअप चालक नंदु जाधव (२५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ८ ऑगस्ट रोजी सव्वा अकराच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर एका २६ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी ही दैनदिन नोकरीचे काम आटोपून थेऊर फाटा येथून राहत्या घरी जाण्याकरीता खासगी वाहनाची वाट पाहत हाती. यावेही नंदु जाधव हा पिक घेऊन तरूणी उभी असलेल्या ठिकाणी आला. त्याने तरूणीला गाडीत बसण्याकरीता विचारणा केली. त्यानुसार होकार देत तरूणी आरोपीच्या पिकअपमध्ये बसली. यानंतर आरोपीने फिर्यादीला अश्लिल स्पर्श करून खाद्यावर हात टाकला. त्यानंतर त्याने तिला काय होतंय एवढं, मला भाडे देवु नका फक्त मला खुश करा असे म्हणून तरूणीचा विनयभंग केला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सहलीच्या बहाण्याने २ लाख ८७ हजारांची फसवणूक

सलग पंधरा वर्षे वर्षातून एकदा सात दिवसांची भारतात तसेच परदेशात सहल, चांगल्या हॉटेलची राहण्यासाठी व्यवस्था करण्याचे आमिष दाखवून दोन लाख ८७ हजार रूपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनम मिश्रा, अल्फीया, विनटेज वेब्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (सर्व रा. नसील लोंढा, सुप्रिमस २, वागळे इस्टेट) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निता बिजेंद्रकुमार मकरारीया (६०, रा. न्याती इस्तबान, महंमदवाडी) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार महमंदवाडी येथे घडला. आरोपींनी विनटेज वेब्स सव्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या खात्यावर एकूण २ लाख ८७ हजार रूपये भरायला लावुन टुरसाठी कोणतीही सर्व्हीस न देता पैसे भरण्यास सांगून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दुचाकी झाडावर आदळून तरूणाचा मृत्यू

भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानंतर ती झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार तरूणाचा अपघानंतर उपचार घेत असताना मत्यू झाला. हा प्रकार तळजाई वसाहत येथील बिकानेर चौकात ३ ऑगस्ट रोजी दोन वाजता घडला होता. नुकताच त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. साहील उमेश जाधव (२३, रा. पर्वती दर्शन चाह, पर्वती) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत संतोष कमलाकर जोशी (४९) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गर्दीचा फायदा घेवुन सोनसाखळ्या चोरी

स्वारगेट परिसरात बसमध्ये चढत असताना झालेल्या दोन सोनासाखळी चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी १ लाख १० हजारांचा ऐवज चोरी करून नेला. पहिल्या घटनेत आशा दिलीप सोनवणे (६०, रा. राधाकृष्णनगरी, आनंदनगर, पुणे) ह्या स्वारगेट येथील बसस्थानकातून वडगावकडे जाणार्‍या पीएमपीएल बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांची ६० हजारांची सोनसाखळी गर्दीचा फायदा घेऊन चोरी करून नेली. हा प्रकार ८ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

तर दुसर्‍या घटनेत निती लक्ष्मण बडे (४७, मु. पो. निजामपुर, सरेकर आळी, ता. मानगाव, जि. रायगड) हे स्वारगेट एसटीस्टॅड येथे कोकणात जाणार्‍या बसस्टॉपवर आले होते. यावेळी ते बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी चोरी करून नेली. दि. ८ ऑगस्ट रोजी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×