Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

येरवड्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत

येरवड्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत

आठ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात टोळक्याने कोयते उागरून दहशत माजविल्याची घटना घडली. टाेळक्याने रहिवाशांना धमकावून शिवीगाळ केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आठ जणंविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकाला अटक केली. या प्रकरणी शैलेश मोहिते (रा. राज चौक, येरवडा) याला अटक करण्यात आली. कोयते उगारून दहशत माजविल्याप्रकरणी मोहिते याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई सूर्यकांत कांबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लक्ष्मी रस्ता परिसरात मोबाइल हिसकावणारे चोरटे गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहेत. आराेपी मोहिते आणि साथीदार ५ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात आले. आरोपी्ंनी कोयते उगारून दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ केले, तसेच घराच्या दरवाज्यावर कोयते आपटून आरोपी पसार झाले. पसार झालेला आरोपी मोहिते याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत आहेत.

ज्येष्ठ महिलेकडील दागिने हिसकावणारे चोरटे गजाआड

पुणे – पादचारी ज्येष्ठ महिलेकडील दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी नऱ्हे भागातील झील काॅलेज चौकात पादचारी महिलेकडील दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. चोरट्यांकडून ६० हजारांचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहुलकुमार शामकुमार (वय ३३), गोविंदाकुमार ओमप्रकाश (वय ३५, दोघे सध्या रा. गणेश हाईट्स, मतेनगर, अंबाईदरा, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तक्रारदार ज्येष्ठ महिला नऱ्हे भागात राहायला आहेत. त्या ४ ऑगस्ट रोजी नऱ्हे भागातील झील काॅलेज चौकातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटे राहुलकुमार आणि गोविंदाकुमार यांनी पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नऱ्हे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, दोघे जण धायरीतील अंबाईदरा परिसरात थांबल्याची माहिती उपनिरीक्षक भांडवलकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. राहुलकुमार, गोविंदाकुमार यांनी दागिने चोरल्याची कबुली दिली. दोघांनी दागिने हिसाकाविण्याचे आणखी किती गुन्हे केले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस कर्मचारी उत्तम तारु व, अणणा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, गणेश झगडे, निलेश भोरडे, तानाजी सागर, राहुल ओलेकर, विनायक मोहिते, सतीश मोरे, संदीप कांबळे, समीर माळवदकर यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×