Breking News
हवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडाGanesh Visarjan Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीरCrop Damage Pune : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणेKatkari Welfare Schemes : ‘लोकसंवाद-२०२६’मधून कातकरी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहितीपीएमपीएल बसप्रवासात ज्येष्ठ महिलेची बांगडी चोरीलापुण्यात गर्दीत महिलांचे दागिने लांबविलेPune MLC Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरलाGender Equality Maharashtra : लिंग समानतेसाठी कालबद्ध कृती आराखडा राबवा

बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा…

उपमुख्यमंत्री अजित पवार

marathinews24.com

बारामती – सार्वजनिक वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याच्यादृष्टीने शहरातील मुख्य १० ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा, चौकाला नावे देण्याची कार्यवाही करण्यासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

गांधी दर्शन शिबिरात विवेकवादावर मंथन; सार्वजनिक जीवनात विवेकाचे अधिष्ठान हवे : अविनाश पाटील – सविस्तर बातमी 

पवार यांनी शहरातील तीन हत्ती चौक परिसर व ध्वजस्तंभ, गुणवडी चौक येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

पवार म्हणाले, नटराज नाट्य कला मंडळाच्या प्रांगणात ३० मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येत असून त्यांचे गतीने काम पूर्ण करा. नगर परिषद कार्यालयाच्या शेजारील जागेवर हुतात्मा स्तंभ उभारण्याच्यादृष्टीने कामे करतांना स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या ठळक घटनांचा समावेश करावा. परिसरात विद्युत रोषणाई होईल, याबाबत दक्षता घ्यावी. नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतीचे स्पष्ट नामफलक लावावेत. सेवा रस्त्याची आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करावीत.

जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सर्व सुविधांनीयुक्त निवासस्थानाचे बांधकाम करावे. नागरिकांची वर्दळ विचारात घेता गुणवडी चौक येथील व्यापारी संकुलतील फरश्या, रंगरंगोटी, रस्ते आदी कामे गतीने पूर्ण करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. शहरात उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कच्या समोरील जागेवर महापुरुषांचे पुतळे बसविण्याचे काम करण्यात येणार असून त्याबाबत आराखड्याचे सुधारित सादरीकरण सादर करावे. बारामती बसस्थानक परिसर स्वच्छ करावा. परिसरात अधिक सावली देणारी वृक्षांची लागवड करावी.

तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्यादृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनीही वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी पंकज भुसे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×