Breking News
Shivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

बेल्जियममध्ये होणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

बेल्जियममध्ये होणार 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना

महाराष्ट्र मंडळ बेल्जियम चा पुढाकार

marathinews24.com

पुणे – बेल्जियममध्ये होणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना – गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषासह श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… चे स्वर आता थेट बेल्जियम मध्ये देखील निनादणार आहेत. महाराष्ट्र मंडळ बेल्जियम आणि शिरीष वाघमारे यांच्या पुढाकाराने बेल्जियम मध्ये दरवर्षी साज-या होणा-या गणेशोत्सवात यंदा प्रथमच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती पुण्यातील मंदिरात विधीवत पूजन करुन नुकतीच महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांकडे ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आली.

मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती च्या चांदीच्या मूर्ती ची विधिवत पूजा ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरामध्ये संपन्न – सविस्तर बातमी 

यावेळी उपक्रमाचे संयोजक शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, रोहित लोंढे आदी उपस्थित होते. श्रीं च्या मूर्तीची उंची अडीच फूट असून पुण्यामध्ये ही मूर्ती सुभाषनगरमधील श्री नटराज आर्टचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी साकारली. शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे यांसह इतर सदस्यांनी ही मूर्ती स्विकारली. तब्बल१७५ देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून यानिमित्ताने बेल्जियम मधील भारतीयांचा उत्साह देखील वाखाणण्यासारखा आहे.

बेल्जियममध्ये होणार 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना

शिरीष वाघमारे म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे बेल्जियम मध्ये आगमन हा महाराष्ट्र मंडळ बेल्जियमचा अभिमानाचा क्षण आहे. यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय आणि महाराष्ट्रीय बांधवांसाठी गणेशोत्सवाचा आनंद घेता येणार असून यानिमित्ताने श्रद्धा आणि संस्कृतीचा सुवास थेट महाराष्ट्रातून बेल्जियम मध्ये पोहोचणार आहे. बाप्पाची बेल्जियम मधील स्थापना ही आमच्यासाठी श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक ठरणार आहे.

महेश सूर्यवंशी म्हणाले, आता विश्वात्मके देवे, हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे वाक्य आहे, ते ख-या अर्थाने साध्य होत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. बेल्जियम मधील गणेशभक्तांची अपार श्रद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर असल्याने श्रीं ची मूर्ती त्यांना देण्यात आली आहे. जवळपास अडीच हजार मराठी बांधव त्याठिकाणी सक्रिय आहेत. तसेच २० ते २५ हजार भारतीय नागरिक उत्सवात सहभागी होतात. लोकमान्य टिळकांची समाज एकसंध होण्याची भावना, भारतासह परदेशात देखील घडत आहे, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र मंडळ बेल्जियम आणि शिरीष वाघमारे यांच्या पुढाकाराने बेल्जियम मध्ये दरवर्षी साज-या होणा-या गणेशोत्सवात यंदा प्रथमच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती मंदिरात विधीवत पूजन करुन नुकतीच महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×