Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघे अटकेत

कात्रज, वारजे भागातील घटना

marathinews24.com

पुणे – पादचारी महिलांकडील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कात्रज आणि वारजे भागात घडली. गेल्या काही दिवसांपासून पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पुणे पोलिस आयुक्तांनी केला मुख्यमंत्र्यांना फोन अन् प्रश्न सुटला – सविस्तर बातमी

कात्रजमधील आंबेगाव परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील आठ हजरांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चाेरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि त्यांचे पती १२ ऑगस्ट रोजी जेवण केल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. आंबेगाव परिसरातील इंद्राणी इंटरनॅशनल स्कूलजवळ दुचाकीस्वरा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करत आहेत.

कात्रज भागातील वरखेडेनगर परिसरात बुधवारी (१३ ऑगस्ट) सकाळी फिरायला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. वारजे परिसरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर पादचारी महिलेच्या गळ्यातील ४२ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावू नेल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी घडली. महिलेने नुकतीच वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×