Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सराईतांकडून चार पिस्तुलांसह, काडतुसे जप्त

गुन्हे शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – बेकायदा देशी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्तुलांसह पाच काडतुसे जप्त करण्यात आली. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात ही कारवााई करण्यात आली.

दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद – कात्रज, वारजे भागातील घटना – सविस्तर बातमी

सूरज उर्फ नन्या संतोष मोरे (वय १९), ओंकार अरुण नादवडेकर (वय १९, दोघे रा. गुलमोहोर पार्क, बकोरी फाटा, वाघोली, नगर रस्ता), जगदीश उर्फ जॅक शंकर दोडमणी (वय २४) , स्वयंम उर्फ अण्णा विजय सुर्वे (१९, दोघे रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी मोरे, नादवडेकर हे भावडी रस्त्यावरील तळ्याजवळ थांबले होते. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी नितीन घाडगे, निर्णय लांडे यांना मिळाली.

पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. चौकशीत आरोपी मोरे, नादवडेकर यांचे मित्र दोडमणी आणि सुर्वे यांच्याकडे पिस्तुले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोडमणी आणि सुर्वे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन पिस्तुले, तसेच चार काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी मोरे, नादवडेकर, दोडमणी, सुर्वे यांच्याकडून देशी बनावटीचे चार पिस्तुले आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी पिस्तुले कोणाकडून आणली, तसेच पिस्तूल बाळगण्या मागचा त्यांचा उद्देश काय ? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, नितीन घाडगे, निर्णय लांडे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे यांनी ही कामगिरी केली.

पिस्तूल बाळगणारा आणखी एक जण अटकेत

वाघोली परिसरात पिस्तूल बाळगणाऱ्या आणखी एकाला पोलिसांनी अटक केली. अंबाजी कल्याण शिंगे (वय २५, रा. म्हाडा काॅलनी, ससाणेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी प्रदिप मोटे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंगे हा वाघाेली परिसरात थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकानेस सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, उपनिरीक्षक मनोज बागल, अमोल काळे आणि पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×