Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे ३० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे लोकार्पण

marathinews24.com

बारामती – नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन देईल, स्वातंत्र्य दिनी मिळालेल्या या अमूल्य देणगीची जतन करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन – सविस्तर बातमी 

नटराज नाट्य कला मंदिराच्या परिसरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या ३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर, रवींद्र लाड, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यलढ्यात बारामतीकरांचा सहभाग

पवार म्हणाले, कवीवर्य मोरोपंत यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बारामती शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध देशभक्त आणि क्रांतिकारकांमध्ये बारामतीकरांचा सहभाग होता. सन १९४२ चा लढा तसेच १९४९ च्या स्वातंत्र्य लढ्यात विविध स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते. नगर परिषदेच्यवतीने सन १९७३ यावर्षी संविधान स्तंभ उभा केला, यामध्ये तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिकांच्या नावांचा शिलालेख समाविष्ट आहे.

राष्ट्रध्वज स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचे प्रतिक

राष्ट्रध्वज देशाच्या स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचे प्रतिक आहे, त्यामधील केशरी रंग हा धैर्य आणि त्याग, पांढरा रंग शांती आणि सत्य आणि हिरवा रंग समृद्धी आणि विश्वास तसेच मध्यभागी असलेले अशोक चक्र कायदा आणि प्रगतीचे प्रतिक आहे. महात्मा गांधी, शहिद भगत सिंग, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देवून राष्ट्रध्वज उंचावला आहे.

नटराज नाट्य कला मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान

आज शहरात नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज स्तंभ बारामतीकरांकरिता अभिमान आणि आनंदाची बाब आहे. स्तंभ उभारण्याकरिता मंडळाने केलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक करुन हा स्तुत्य असा उपक्रम आहे. गेल्या ४५ वर्षात मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, ऐतिहासिक, भावस्पर्शी कथनावरील नाटकांचा समावेश असलेले तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे सुद्धा आयोजन केले असून या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार कलाविष्कार पाहायला मिळाला असेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

इंदोर शहराच्या धर्तीवर शहराचा विकास करण्याचा मानस

इंदोर शहराच्या धर्तीवर बारामती शहराचा विकास करण्याचा मानस व्यक्त करुन पवार म्हणाले, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात येणार आहे. शहरात अनधिकृत जाहिरात फलक लागणार नाही, स्वच्छता राहिली पाहिजे, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखली पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी. याकरिता नागरिकांनी प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,

नागरिकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा मिळवून देण्याकरिता तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच विकास कामाच्या अनुषंगाने विधायक सूचनाही कराव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री  पवार यांनी केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तीन हत्ती चौकाला ‘तिरंगा सर्कल’ असे नाव देण्यात आले असून या नामफलकाचे पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना विशेष सेवा पदक प्रदान

उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याकरिता केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्य शासनाच्यावतीने ‘विशेष सेवा पदक’ जाहीर करण्यात आले, आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते डॉ. राठोड यांना विशेष सेवा पदक प्रदान करुन त्यांनी गडचिरोली येथे केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी ‘मेरा भारत महान’ देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला, याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×